News Flash

प्रो-कबड्डीचा थरार २८ जुलैपासून, सलामीलाच मुंबई-पुण्याचे संघ भिडणार

मुंबई-पुण्याचे संघ पाचव्या पर्वात भिडणार

प्रो-कबड्डीचा थरार २८ जुलैपासून, सलामीलाच मुंबई-पुण्याचे संघ भिडणार

गेली काही वर्ष क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रो-कबड्डीच्या ५ व्या पर्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. २८ जुलैपासून प्रो-कबड्डीचं पाचवं पर्व सुरु होतं असून यावेळी १२ संघ यात सहभागी होणार आहे. यंदाच्या पर्वात क्रीडारसिकांना १३० सामन्यांची पर्वणी असून हे पर्व खऱ्या अर्थाने ब्लॉकस्टर ठरेल असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय.

महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली ३ पर्व सतत अंतिम फेरीत प्रवेश करणारा अनुप कुमारची यु मुम्बा आणि आणि दिपक हुडाची पुणेरी पलटण यांच्यात सलामीचा दुसरा सामना होणार आहे. तर पहिला सामना हैदराबाद आणि चेन्नईच्या संघात होणार आहे.
स्पर्धेचं तिसरं आणि चौथं पर्व पटणा पायरेट्स संघाने जिंकल्यामुळे या स्पर्धेत एक वेगळीच चुरस निर्माण झाली होती. त्यातच यंदाच्या पर्वापासून ४ नवीन संघ यात सहभागी होणार आहेत. सचिन तेंडुलकर आणि एन.प्रसाद यांच्या मालकीची ‘तामिळ थलायवाज’, जीएमआर उद्योगसमुहाची ‘युपी योद्धा’, अदानी ग्रुपच्या मालकीची ‘गुजरात फॉर्च्युन जाएंट्स’, आणि जेएसडब्ल्यू उद्योग समुहाची ‘हरियाणा स्टिलर्स’ हे चार संघ यंदा प्रो-कबड्डीच्या मैदानावर आपलं नशीब आजमावणार आहेत.

मे-महिन्यात प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाचा लिलाव झाला होता. त्याआधी प्रत्येक संघ मालकाला आपल्या आवडीचा एक खेळाडू कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. यंदाच्या पर्वात ११ संघ हे दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर ६ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाच प्रो-कबड्डीचं पर्व हे अधिक रोमांचक होईल यात काही शंका नाही.

स्पर्धेचं पुर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे : –
vivo-pkl-5-match-fixtures-2-page-001

vivo-pkl-5-match-fixtures-2-page-002

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2017 7:38 pm

Web Title: pro kabaddi season 5 detail schedule released
Next Stories
1 मयंती लँगरच्या व्हिएतनाम ट्रिपचे खास फोटो
2 ‘डेहराडून गर्ल’ भूमिका शर्मा ‘मिस वर्ल्ड’
3 ..प्रशिक्षक म्हणून कुंबळे या गोष्टींमध्ये पडले कमी!
Just Now!
X