23 September 2020

News Flash

पुणेरी पलटणचा संघ कसबा गणपतीच्या दर्शनाला

दीपक हुडाच्या नेतृत्वाखाली पुण्याची चांगली कामगिरी

दीपक हुडा आणि इतर खेळाडूंचा सत्कार करताना कसबा गणपती मंडळाचे पदाधिकारी

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही गणेशोत्सव आणि त्यांच्या मिरवणुका हा एक आकर्षणाचा भाग असतो. सध्या सर्व मानाच्या गणपतींना भेट देण्यासाठी भक्तमंडळी मंडळांमध्ये गर्दी करतायत, मग अशावेळी आपले प्रो-कबड्डीचे खेळाडू कसे मागे राहतील. पुणेरी पलटणच्या संघाने काही दिवसांपूर्वी पुण्याच्या मानाच्या कसबा गणपतीला भेट दिली. पुण्याचं ग्रामदैवत असलेला कसबा गणपतीला पुण्यातल्या मानाच्या ५ गणपतींमध्ये पहिलं स्थान आहे.

पुणेरी पलटणचा कर्णधार दिपक हुडा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कसबा गणपतीला भेट दिली. यावेळी दिपक हुडाच्या हस्ते खास गणपतीची आरतीही करण्यात आली. यावेळी दिपकसोबत त्याचे सहकारी राजेश मोंडल, संदीप नरवाल आणि अन्य सहकारीही उपस्थित होते.

सध्या प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात दिपक हुडाच्या नेतृत्वाखाली खेळणारा पुणेरी पलटणचा संघ २६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबी, जयपूरसारख्या महत्वाच्या संघाना पिछाडीवर टाकत पुणेरी पलटण यंदा या हंगामात आगेकूच करतंय. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये पुणेरी पलटणचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. या भेटीचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 8:50 pm

Web Title: pro kabaddi season 5 puneri paltan team visit kasba ganpti mandal in pune seeks blessing for next matches
Next Stories
1 सरदार सिंह, देवेंद्र झाजरिया खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
2 ध्यानचंद यांच्याविषयी माहिती असायलाच हवी, सेहवागचा ट्विटर ‘स्ट्रोक’
3 सिंधू-सायनासोबत सेल्फी घेण्यासाठी ऑलिम्पिक विजेत्या मरीनची आई रांगेत
Just Now!
X