प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यंदा या पर्वात ४ संघ नव्याने दाखल झालेले असून यामुळे स्पर्धेची व्याप्तीही वाढवण्यात आलेली आहे. यंदाच्या पर्वात ‘यूपी योद्धा’ संघाकडून खेळणारा नितीन तोमर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. उत्तर प्रदेशने नितीन तोमरला तब्बल ९३ लाखांची बोली लावली. मात्र आजही या खेळाडूचे पाय जमिनीवर आहेत. सर्वात महागडा खेळाडू ठरला असूनही नितीन आजही शेतात तितक्याच मेहनतीने राबताना दिसतो.

नितीन तोमर हा उत्तरप्रदेशच्या बगपत जिल्ह्याच्या मलकपूर गावाचा रहिवासी आहे. आपल्या लहानपणापासून कबड्डी खेळत असलेल्या नितीन नौदलात दाखल झाला. आजही सेनादलाच्या संघाकडून नितीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला आहे. मात्र नितीनचा परिवार आजही शेतामध्ये राबतो. मध्यंतरी माध्यमांनी नितीनला, प्रो-कबड्डीच्या लिलावात मिळालेल्या रकमेचं काय करणार असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी नितीनने कोणताही विचार न करता, “बहिणीच्या लग्नासाठी थोडे पैसे ठेवीन आणि बाकीचे शेतीच्या कामासाठी वापरीन”, असं उत्तर दिलं होतं.

Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”
| 6-year-old mistakes Leander Paes for a dancer His reaction is pure gold
लिएंडर पेस आहे डान्सर? चिमुकलीची गोंडस चूक पाहून दिग्गज खेळाडू म्हणाला, “अफवा खरी आहे”
footballers opt to cut holes in their socks
फुटबॉलपटू कोट्यधीश असूनही मैदानात फाटके मोजे का घालतात?
Hockey coach Craig Fulton decision to select all potential Olympic players for the Australian tour sport news
ऑलिम्पिकसाठीच्या सर्व संभाव्य खेळाडूंची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड; हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांचा निर्णय

नितीनचा भाऊ निखील आजही कबड्डी खेळतो, तर त्याची छोटी बहीण बीएससीचं शिक्षण घेतेय. आपल्या नातवाचं कौतुक करताना नितीनच्या आजीने त्याचं तोंडभरुन कौतुक केलंय. नौदलाच्या सेवेतून जेव्हा कधी नितीन सुट्टीवर घरी येतो, तेव्हा तो लगेच कबड्डीच्या मैदानावर पळतो असं नितीनच्या आजीने सांगितलं. नितीनला लहानपणी कुस्ती खेळायची होती, मात्र त्यावेळी गावात फारशा संधी नसल्याने नितीनला आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं. मात्र यावर हार न मानता नितीने लहानपणीच आमचा मोर्चा कबड्डीकडे वळवला. लहानवयातच त्याची मैदानातली कामगिरी पाहून पुढे याच क्षेत्रात करियर घडवण्याचा सल्ला त्याला त्याच्या प्रशिक्षकांनी दिला.

२०१२ साली एका स्थानिक स्पर्धेत खेळताना नितीनचा खेळ पाहून त्याला सेनादलाच्या तिन्ही संघानी आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली होती. मात्र यावेळी नितीनने नौदलाची निवड केली आणि स्पोर्ट्स कोट्यातून नितीनला नौदलाची नोकरीही मिळाली. सध्या नितीनचं पोस्टिंग मुंबईत आहे.

 

आपल्या आजीसोबत कबड्डीपटू नितीन तोमर 
९३ लाखांची बोलीची लागूनही नितीनचे पाय जमिनीवरच 
मुंबईत नौदलाच्या सेवेत असताना नितीन तोमर
आपल्या आईसोबत नितीन तोमर
गावात होळी खेळून झाल्यानंतर बुलेटसोबत नितीन तोमर

 

२०१६ साली बंगळुरुत फेडरेशन करंडकात सुवर्णपदक मिळवल्यानंतर नितीन तोमर
स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर नितीनला शाबासकी देताना गावकरी
प्रो-कबड्डीच्या यंदाच्या हंगामात नितीनला यूपी योद्धाजकडून सर्वाधिक ९३ लाखांची बोली