प्रो-कबड्डीचा सहावा हंगाम सुरु होण्यासाठी अजुन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र याआधीच यू मुम्बाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आलेली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईमधून प्रो-कबड्डीचे सामने हद्दपार होण्याची शक्यता आहे. मैदानाचं वाढलेलं भाडं सध्या यू मुम्बाच्या संघमालकांना पेलवत नाहीये. पहिल्या पाच हंगामापर्यंत यू मुम्बाचे घरच्या मैदानातले सामने हे वरळीच्या NSCI (National Sports Club of India) च्या मैदानात खेळवले जात होते. मात्र या प्रत्येक सामन्यासाठी यू मुम्बाच्या संघमालकांना २५ लाख रुपये मोजावे लागत होते. हा खर्च संघाला पेलवत नसल्याने, यू मुम्बाच्या प्रशासनाने पर्यायी जागेचा विचार सुरु केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकला यू मुम्बाच्या घरच्या मैदानावरचे सामने भरवण्याचा मान मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यू मुम्बाचे संघमालक रॉनी स्क्रूवाला यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राला यासंदर्भात माहिती दिली. “यू मुम्बाचे सामने मुंबईत खेळवले जाणार नाहीत ही आमच्यासाठी मोठी दु:खाची गोष्ट आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सामन्यांच्या आयोजनावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च झालेला आहे. १० दिवसांच्या आयोजनासाठी आम्हाला २ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागत आहे. हा खर्च आमच्या अवाक्याबाहेरचा असल्यामुळे आम्ही NSCI च्या जागेला पर्याय शोधत आहोत. मात्र इतर मैदानांमध्ये प्रेक्षकांसाठीची आसनक्षमता कमी असल्यामुळे त्या जागेचा विचार करता येणार नाही. नाशिकमध्ये मिनाताई ठाकरे इनडोअर स्टेडीयमचं भाडं हे १५ हजार रुपये आहे. हा खर्च आमच्या अवाक्यात आहे, याचसोबत या मैदानाची आसनक्षमता अडीच हजारांच्या घरात असल्याने इथे प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.”

यू मुम्बाची प्रो-कबड्डीच्या पर्वातली आतापर्यंतची कामगिरी –

२०१४ – उप-विजेते
२०१५ – विजेते
२०१६ – उप-विजेते
२०१६ – पाचव्या स्थानावर
२०१७ – साखळी फेरीमधून बाद

सहाव्या हंगामात असा असेल यू मुम्बाचा संघ – 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 u mumba might loose mumbai as a hosting city nashik can be the alternative option
First published on: 25-07-2018 at 13:21 IST