तब्बल १३ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या कबड्डी संघातील खेळाडूंना यंदाच्या प्रो-कबड्डीच्या हंगामात चांगली मागणी पहायला मिळाली. मात्र यू मुम्बाने स्थानिक खेळाडूंना डावलून इतरांना संधी दिल्यामुळे सोशल मीडियावर चाहता वर्ग यू मु्म्बाच्या रणनितीवर चांगलाच नाराज झाला आहे. कालच्या दिवसात यू मुम्बाने अनुप कुमारला कायम न राखण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईकर रिशांकला यू मुम्बा लिलावात विकत घेईल असा अनेकांनी अंदाज बांधला होता. मात्र उत्तर प्रदेशने अटीतटीच्या लढाईत बाजी मारत रिशांकला आपल्या संघात कायम राखलं, रिशांकसाठी उत्तर प्रदेशने १ कोटी पेक्षा जास्त रक्कम मोजली. याचसोबत पाचव्या हंगामात बहारदार कामगिरी करणाऱ्या नवोदीत श्रीकांत जाधवलाही कायम राखण्यात मुम्बाच्या संघाने रस दाखवला नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर यू मुम्बाच्या चाहत्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र अन्य संघांनी संधी साधत महाराष्ट्राच्या खेळाडूंना आपल्या संघात कायम राखलं आहे. विशाल मानेला दबंग दिल्ली, सचिन शिंगाडेला हरयाणा स्टिलर्स, तुषार पाटीलला पटणा पायरेट्स, विकास काळेला पटणा पायरेट्स या संघांनी पसंती दर्शवली आहे. याचसोबत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा हातभार उचलेल्या ऋतुराज कोरावीलाही गुजरातच्या संघाने ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात कायम राखलं. पाचव्या हंगामात यू मुम्बाकडून खेळणाऱ्या नितीन मदनेवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. मुंबईच्या संघात एकही अनुभवी चढाईपटू नसल्यामुळे, हा संघ इतर संघांचा कसा सामना करेल अशी शंका सोशल मीडियावर विचारली जात आहे.
- भानूप्रताम तोमर ८ लाखाच्या बोलावर उत्तर प्रदेश संघाकडे
- महेंद्र रेड्डी ८ लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्स संघाकडे
- १२ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थ दबंग दिल्ली संघाकडून खेळणार
- रविंदर पेहल २० लाखांच्या बोलीवर दबंग दिल्लीकडे
- १२ लाखांच्या बोलीवर रोहित बलियान यू मुम्बाकडे
- एम. शिव रामकृष्ण ८ लाखांच्या बोलीवर जयपूरच्या संघाकडे
- राकेश कुमार सिंह १२ लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्स संघाकडे
- डी. गोपू ८ लाखांच्या बोलीवर तामिळ थलायवाज संघाकडून खेळणार
- अमित शर्मासाठी गुजरात फॉर्च्युनजाएंटने मोजले ८ लाख
- अमित ८ लाखांच्या बोलीवर उत्तर प्रदेश योद्धा संघाकडून खेळणार
- अरमान ५ लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्सकडून खेळणार
- ब्रिजेंद्रसिंह चौधरी ५.६० लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार
- आनंद पाटील ८ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार
- ८ लाखांच्या बोलीवर अनिल बंगळुरु बुल्स संघाकडून खेळणार
- अभिषेक सिंहवर ४२.८० लाखांची बोली, यू मुम्बाकडून खेळणार
- अक्षय जाधव ८ लाखांच्या बोलीवर पुणेरी पलटण संघाकडे
- कमल किशोर जट ८ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडे
- आनंद व्ही. ८ लाखांच्या बोलीवर बंगळुुरु बुल्स संघाकडून खेळणार
- अनिल कुमार ८ लाखांच्या बोलीवर तामिळ थलायवाज संघाकडे
- मनजीत २०.४० लाखांच्या बोलीवर पटणा पायरेट्स संघाकडे
- सुनील सिद्धगवळी ८ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार
- अर्जुन देशवाल ८ डलाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडे
- सिद्धार्थ देसाई ३६.४० लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडून खेळणार
- अमित कुमार ८ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडे
- विकास जगलान ८ लाखांच्या बोलीवर पटणा पायरेट्स संघाकडे
- अतुल एम.एस. वर तामिळ थलायवाजची ९.२० लाखांची बोली
- पवन कुमारवर बंगळुरु बुल्सची ५२.८० लाखांची बोली
- गंगाधारी मल्लेश ८ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडे
- ८ लाखांच्या बोलीवर प्रवेश पुणेरी पलटण संघाकडे
- शुभम पालकर ८ लाखांच्या बोलीवर गुजरातच्या संघाकडे
- रोहित कुमार चौधरीवर उत्तर प्रदेश योद्धाज संघाकडून ८ लाखांची बोली
- क गटात महाराष्ट्राच्या नितीन मदनेवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- नितीन मवी ८ लाखांच्या बोलीवर उत्तर प्रदेश योद्धाज संघाकडे
- नितेश बी. आर. ८ लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्सकडे
- ८ लाखांच्या बोलीवर संकेत चव्हाण तेलगू टायटन्स संघाकडे
- सचिन कुमार १९.२० लाखांच्या बोलीसह उत्तर प्रदेशच्या संघात
- सचिन विठ्ठल २० लाखांच्या बोलीवर गुजरातच्या संघात
- ३०.४० लाखांची बोली लावत गुजरातने ऋतुराजला संघात दाखल करुन घेतलं
- मुंबईच्या ऋतुराज कोरावीवर गुजरातच्या संघाची बोली
- विकासवर २७.४० लाखांची बोली
- महाराष्ट्राचा विकास काळे सहाव्या हंगामात पटणा पायरेट्सकडून खेळणार
- आदिनाथ गवळी ८ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाच्या ताफ्यात दाखल
- विजीन थंगादुराई ८.४० लाखाच्या बंगाल वॉरियर्स संघाकडे
- अखेर १४.६० लाखांच्या बोलीवर बाजीराव जयपूरच्या संघाकडे
- मुंबईचा बाजीराव होडगेसाठी मुंबई आणि जयपूर संघांमध्ये चुरस
- महेंद्रसिंह ढाका ८ लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्स संघाकडे
- विनोद कुमार २०.२ लाखांच्या बोलीवर पुणेरी पलटण संघाकडे
- सी. मनोज कुमार ८ लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्सकडे
- संदीप ८ लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्सकडे
- अनिल कुमार ८ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडे
- जवाहर विवेक ८ लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्स संघाकडे
- भुपिंदर सिंह ८ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडे
- ८ लाखांच्या बोलीवर नरेंद्र उत्तर प्रदेश संघाकडे
- महेश मारुती मगदुम ८ लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्स संघाकडे
- राजेश नरवाल १६ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्लीकडे
- १२ लाखांच्या बोलीवर आर. श्रीराम यू मुम्बा संघाकडे
- सेल्वामणी १५ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडे
- तुषार पाटील २० लाखांच्या बोलीवर पटणा पायरेट्स संघाकडे
- अजय कुमार २५ लाखांच्या बोलीवर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडे
- शब्बीर बापू १५.५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडे
- चंद्रन रणजित ६१.२५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्लीकडून खेळणार
- सुरजित सिंह १२ लाखांच्या बोलीवर तामिळ थलायवाजच्या संघात
- सुरिंदर सिंहवर १२.२५ लाखांची बोली, पाटणा पायरेट्स संघाकडून खेळणार
- दर्शन कादीयान १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाकडून खेळणार
- सहाव्या हंगामासाठी उत्तर प्रदेश योद्धाज कडून खेळणार
- दुसऱ्या फळीतल्या प्रशांत कुमार रायला १२ लाखांवरुन थेट ७९ लाखांची बोली
- महेश गौड १२ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडून खेळणार
- यू मुम्बाच्या खात्यात पहिला चढाईपटू, विनोद कुमार २२.२५ लाखांच्या बोलीवर मुंबईकडून खेळणार
- हरयाणा स्टिलर्सची विकास कंडोलावर ४७ लाखांची बोली, एफबीएम कार्डाचा केला वापर
- जसवीर सिंहवर तामिळ थलायवाजची १२ लाखांची बोली
- महाराष्ट्राच्या सचिन शिंगाडेवर हरयाणा स्टिलर्सची २० लाखांची बोली
- रोहित राणा १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडे, मुंबईच्या खात्यात चढाईपटूंची कमतरता
- आशिष कुमार सांगवानवर बंगळुरु बुल्स कडून २३.५ लाखांची बोली
- रवी कुमार १६ लाखांच्या बोलीवर पुणेरी पलटण संघाकडून खेळणार
- जोगिंदर नरवाल ३३ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडून खेळणार
- राजगुरू सुब्रमण्यम १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाकडून खेळणार
- मुंबईचा विशाल माने ४५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडून खेळणार
- अनुभवी बचावपटू धर्मराज चेरलाथन ४६ लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडून खेळणार
- मात्र एफबीएम कार्डाचा वापर करत दिल्लीने विराजला संघात कायम राखलं
- महाराष्ट्राच्या विराज विष्णु लांडगेवर यू मुम्बाची २५ लाखांची बोली
- सतपाल १२ लाखांच्या बोलीवर दिल्लीकडून खेळणार
- उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणार सागर
- दुसऱ्या दिवशी पहिली बोली लागली. सागर कृष्णावर १४.२५ लाखांची बोली
- लागोपाठ ३ खेळाडूंवर कोणत्याही संघमालकांकडून बोली नाही
- अनुभवी खेळाडू राकेश कुमारवर बोली नाही
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2018 9:57 am