प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर हरयाणा स्टिलर्स संघाविरुद्ध खेळत असताना प्रदीपने, प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये ९०० गुणांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा प्रदीप प्रो-कबड्डीमधला एकमेव चढाईपटू ठरला आहे. हरयाणा स्टिलर्स विरुद्ध सामन्यात प्रदीप नरवालने चढाईमध्ये १४ गुणांची कमाई केली.

सध्या तामिळ थलायवाज संघाचा राहुल चौधरी हा चढाईमध्ये प्रदीप नरवालच्या मागे आहे. राहुलच्या नावावर प्रो-कबड्डीच्या इतिहासात आतापर्यंत ८६४ गुण जमा आहेत. चढाईमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंची नावं…..

१) प्रदीप नरवाल – पाटणा पायरेट्स – ९०३ गुण

२) राहुल चौधरी – तामिळ थलायवाज – ८६४ गुण

३) अजय ठाकूर – तामिळ थलायवाज – ७५२ गुण

४) दिपक निवास हुडा – जयपूर पिंक पँथर्स – ७५१ गुण

५) रोहित कुमार – बंगळुरु बुल्स – ५८६ गुण

अत्यंत कमी वयात प्रो-कबड्डीसारख्या व्यासपीठावर येऊन प्रदीपने दिग्गज खेळाडूंना टक्कर देत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. गेल्या काही हंगामातला प्रदीपचा फॉर्म पाहता, आगामी काळात तो चढाईमध्ये हजार गुणांचा टप्पाही लवकरच पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र चढाईत १४ गुणांची कमाई करुनही प्रदीप आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हरयाणा स्टिलर्सने पटणा पायरेट्स संघावर ३५-२६ ने मात केली.