News Flash

Pro Kabaddi 7 : राहुल चौधरीची घौडदौड सुरुच, पाटण्याविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

९०० गुणांचा टप्पा गाठणारा राहुल पहिला खेळाडू

प्रो-कबड्डीचे पहिले ६ हंगाम तेलगू टायटन्स संघाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर, ‘पोस्टर बॉय’ या नावाने ओळखला जाणारा राहुल चौधरी पुन्हा एकदा चमकला आहे. मुंबईत पाटणा पायरेट्सविरुद्ध सामन्यात राहुलने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात ९०० गुण मिळवणारा राहुल पहिलाच खेळाडू ठरला आहे. पाटण्याविरुद्ध सामन्यात १४ चढायांमध्ये राहुलने ५ गुण कमावत ९०० गुणांचा टप्पा गाठला. मात्र या सामन्यात राहुल आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पाटणा पायरेट्सने अखेरच्या सेकंदात बाजी मारत २४-२३ अशा एका गुणाच्या फरकाने सामना जिंकला.

या ९०० गुणांपैकी ८४६ गुण हे राहुल चौधरीने चढाईमध्ये मिळवले आहेत. चढाईत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल चौधरी दुसऱ्या स्थानावर आहे.

प्रो-कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणार खेळाडू –

राहुल चौधरी – (तामिळ थलायवाज) : १०३ सामने ९०० गुण
प्रदीप नरवाल – (पाटणा पायरेट्स) : ८८ सामने ८८३ गुण
दीपक हुडा – (जयपूर पिंक पँथर्स) : १०५ सामने ८०२ गुण
अजय ठाकूर – (तामिळ थलायवाज) : १०५ सामने ७६५ गुण
रोहित कुमार – (बंगळुरु बुल्स) : ७५ सामने ६२० गुण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:10 pm

Web Title: pro kabaddi season 7 rahul choudhari creates record reach 900 points mark psd 91
Next Stories
1 कर्णधारपदासाठी शोएब अख्तरची रोहितपेक्षा कोहलीलाच पसंती
2 पृथ्वी शॉच्या आधी ‘हे’ क्रिकेटपटू आढळले डोपिंग चाचणीत दोषी
3 ‘पृथ्वी शॉ लहान आहे, त्याला काळजीपूर्वक हाताळावं’, हर्षा भोगलेंचा सल्ला
Just Now!
X