News Flash

Pro Kabaddi 7 : विराटच्या उपस्थितीत मुंबई पर्वाचा श्रीगणेशा

यू मुम्बा घरचं मैदान गाजवायला सज्ज

प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वातील पहिला टप्पा पार पडला आहे. यजमान तेलगू टायटन्स संघाने हैदराबादमधील आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत या पर्वाला सुरुवात केली. यानंतर प्रो-कबड्डीचं हे वादळ आता मुंबईत येऊन धडकणार आहे. २७ जुलैपासून प्रो-कबड्डीच्या मुंबई पर्वाला सुरुवात होणार आहे. या पर्वातील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली उपस्थित राहणार आहे. यजमान यू मुम्बा पहिल्या सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पुणेरी पलटणविरुद्ध लढेल. यानंतर जयपूर पिंक पँथर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना होईल.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दबंग दिल्लीने दोन सामन्यात, दोन थरारक विजयांची नोंद करत १० गुणांनिशी पहिलं स्थान पटकावलं आहे. यू मुम्बाला पहिल्या टप्प्यात एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना यू मुम्बाची कामगिरी कशी होतेय याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : भारत हे माझ्यासाठी दुसरं घर – फजल अत्राचली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 2:58 pm

Web Title: pro kabaddi season 7 virat kohli to grace the opening of mumbai leg psd 91
Next Stories
1 टीम इंडियाविरोधातील वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे माजी पाक क्रिकेटपटूला आदेश
2 Japan Open : ६ दिवसात सिंधूचा एकाच खेळाडूकडून दोनदा पराभव
3 तुमचं बलिदान अविस्मरणीय, क्रीडापटूंची कारगिल शहीदांना मानवंदना
Just Now!
X