18 September 2020

News Flash

प्रो कबड्डीच्या आगामी हंगामासाठी यू मुंबा संपूर्ण संघ बदलणार

एकंदर ९ संघांनी पाचव्या हंगामातील २१ खेळाडूंना आपल्या संघात कायम राखले आहे.

अनुप कुमार

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामासाठी यू मुंबाने संपूर्ण संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावाला सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. यात यू मुंबा संघाने अनुप कुमारसहित एकाही खेळाडूला कायम ठेवले नाही. एकंदर ९ संघांनी पाचव्या हंगामातील २१ खेळाडूंना आपल्या संघात कायम राखले आहे.

तीन वेळा प्रो कबड्डी विजेत्या पाटणा पायरेट्सने प्रदीप नरवाल याला संघात कायम ठेवले आहे. तामिळ थलायव्हासनेही अजय ठाकूरवर विश्वास व्यक्त केला आहे. दबंग दिल्लीने मेराज शेख आणि तेलुगू टायटन्सने मोहसीन मॅघसॉडलोजाफारी या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. गुजरात फॉच्र्युनजायंट्सने तीन युवा खेळाडूंना कायम ठेवले आहे.

कायम राखलेले खेळाडू

  • बंगाल वॉरियर्स : सुरजीत सिंग, मणिंदर सिंग
  • बेंगळूरु बुल्स : रोहित कुमार; दबंग दिल्ली : मेराज शेख
  • गुजरात फॉर्च्यूनजायंट्स : सचिन, सुनील कुमार, महेंद्र रजपूत
  • हरयाणा स्टीलर्स : कुलदीप सिंग
  • पाटणा पायरेट्स : प्रदीप नरवाल, जयदीप, जवाहर डागर, मनीष कुमार
  • पुणेरी पलटण : संदीप नरवाल, राजेश मोंडल, जी. बी. मोरे, गिरीश ईर्नाक
  • तामिळ थलायव्हास : अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
  • तेलुगू टायटन्स : नीलेश साळुंखे, मोहसीन मॅघसॉडलोजाफारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:02 am

Web Title: pro kabaddi upcoming league u mumba
Next Stories
1 इंग्लंडची भारतावर मात
2 प्रदीपला रौप्यपदक!
3 सुरियाला अखेरचे स्थान
Just Now!
X