News Flash

Pro Volleyball League : कोची ब्ल्यू स्पाईकर्सची यू मुम्बा व्हॉलीवर मात

4-1 च्या फरकाने मिळवला विजय

प्रो-व्हॉलीबॉलच्या पहिल्या वहिल्या पर्वाला कालपासून कोचीच्या राजीव गांधी इनडोअर मैदानात सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात कोची ब्ल्यू स्पाईकर्स संघाने यू मुम्बा व्हॉलीवर 4-1 ने मात केली. या स्पर्धेची ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या पी.व्ही.सिंधूनेही सलामीच्या सामन्याला हजेरी लावली होती, यावेळी झालेल्या छोटेखानी सोहळ्यानंतर स्थानिक पाठीराख्यांनी कोचीच्या संघाला पाठींबा देण्यासाठी मैदानात गर्दी केली होती.

बऱ्याच आघाडीवर एकतर्फी झालेल्या सामन्यात कोचीने यू मुम्बावर 15-11, 15-13, 15-8, 15-10, 5-15 अशी मात केली. कोचीकडून मनू जोसेफने सर्वाधिक 15 गुणांची कमाई केली. यामध्ये 14 स्मॅश आणि एका ब्लॉकचा समावेश होता. यू मुम्बाकडून कॅनडाच्या निकोलस डेल बिनाकोने सर्वाधिक 10 गुणांची कमाई केली. अखेरचा सेट वगळता सलामीच्या सामन्यात यू मुम्बा व्हॉलीचे खेळाडू फॉर्मात दिसले नाही. कोचीच्या खेळाडूंनी सामन्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं.

कोचीकडून मनू जोसेफने आक्रमण आणि बचाव या दोन्ही पातळ्यांवर सर्वोत्तम कामगिरी बजावली. त्याला इतर खेळाडूंचीही चांगली साथ लाभली. या स्पर्धेतला दुसरा सामना कॅलिकत हिरोज विरुद्ध चेन्नई स्पार्टन्स संघांमध्ये होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 10:16 am

Web Title: pro volleyball league kochi blue spikers register a dominating 4 1 win over u mumba volley
Next Stories
1 आईच्या निधनाचं दुःख विसरुन तो मैदानात उतरला, विंडीजच्या खेळाडूचं सर्वत्र कौतुक
2 घरच्या मैदानावर विंडीजची सरशी, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडवर मात
3 अखेरच्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेवरही 4-1 ने कब्जा
Just Now!
X