करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ८ महिन्यांच्या कालावधीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे सामने स्थगित केले होते. आयपीएलचा तेरावा हंगाम पार पडल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने प्ले-ऑफच्या सामन्यांचं आयोजन केलं होतं. मुलतान विरुद्ध कराची या अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यात बाबर आझमच्या कराची संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

अवश्य वाचा – Video : सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूला आली ‘लघुशंका’, खेळाडूंनी केलं ऑन कॅमेरा ट्रोल

मात्र या सामन्यादरम्यान घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाने मैदानावर उपस्थित सर्व खेळाडूंमध्ये हशा पिकला. १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कराचीचा संघ १३ षटकांनंतर ३ बाद ९० अशा परिस्थितीत होता. मात्र १४ वं षटक सुरु होण्याआधी मैदानावर एका कुत्र्याने एंट्री घेतली…आणि या कुत्र्याने थेट खेळपट्टीवर जाऊन ठाण मांडलं. ज्यामुळे सामना काही क्षणांसाठी थांबवावा लागला.

दरम्यान अखेरच्या षटकांमध्ये पडझड झाल्यामुळे कराचीच्या संघाला सामना बरोबरीत सोडवण्यात समाधान मानावं लागलं. यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली ज्यात मोहम्मद आमिरने मुलतानच्या संघाला १३ धावांचं लक्ष्य पूर्ण करु दिलं नाही.