क्रिकेट विश्वातील दिग्गज, समालोचक आणि टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लंडनमध्ये पार पडला. यावेळी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या प्रशिक्षकाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला.

दरम्यान, विराट कोहलीने आपला सर्वात संस्मरणीय अनुभव रवी शास्त्रींसोबत शेअर केला. पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात विराटने खोलीत उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षक शास्त्री यांना त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले.

विराट कोहली म्हणाला, प्रशिक्षक रवी शास्त्री खूप लिहू शकतात. कारण त्यांच्याकडे जगाला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्याच्या अमूल्य क्षणाबद्दल सांगताना विराट म्हणाला की, २०१४ च्या दरम्यान, जेव्हा संघ खडतर परिस्थितीतून जात होता, तेव्हा रवी शास्त्रींच्या भाषणाने त्यांना प्रेरणा दिली आणि सकारात्मक दृष्टिकोण तयार झाला.