ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय विजयात सिहांचा वाटा उचलणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बीसीसीआय खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. पुजारला अ+ श्रेणीत समाविष्ट करण्याचा विचार बीसीसीआय कडून सुरू आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियातील मालिकेत पाच डावांत फलंदाजी करताना तीन शतकांसह ५२१ धावां केल्या आहेत. त्यासाठी बीसीसीआयने नियम शिथिल करत त्याला बढती देता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे.

सध्या पुजारा अ श्रेणीमध्ये आहे आणि त्याचे मानधन पाच कोटी रूपये आहे. जर पुजराला अ+ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले तर पुजराला वर्षाला सात कोटी रूपये मानधन मिळणार आहे. पुजाराच्या दमदार कामगिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच मालिका विजय मिळविण्याची संधी चालून आल्यामुळे बीसीसीआयकडून त्याला या कामगिरीची पोचपावती दिली जाऊ शकते.

गेल्या वर्षी मंजूर झालेल्या सुधारित मानधन आराखड्यानुसार अ+श्रेणीसाठी ७ कोटी खेळाडूला मिळणार आहेत तर अ श्रेणीतील खेळाडूला ५ कोटी निश्चित करण्यात आले आहेत.ब आणि क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ३ आणि १ कोटी इतके मानधन मिळते. अ+ श्रेणीत कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.