राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी २६ लाख रुपयांची मदत दिली आहे.

गोपीचंद यांनी पंतप्रधानांच्या मदतनिधीला ११ लाख, तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीला १० लाख आणि आंध्र प्रदेश मुख्यमंत्री मदतनिधीला पाच लाख रुपये दिले आहेत.

‘‘सध्याच्या करोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्य सरकार मिळून चांगले काम करत आहे. मीसुद्धा सर्वाना घरी राहण्याचेच आवाहन करत आहे,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

विश्वविजेत्या बिलियर्ड्स आणि स्नूकरपटू पंकज अडवाणी याने करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. ‘‘माझ्याकडून पंतप्रधान मदतनिधीला पाच लाख रुपयांची मदत करत आहे. या कठीण प्रसंगात सर्वानी एकत्र येत करोनाविरुद्ध लढा द्यायचा आहे,’’ असे अडवाणीने म्हटले.