22 September 2020

News Flash

Pulwama Terror Attack : BCCI ला उशिराने शहाणपण; पाक खेळाडूंबाबत घेतला ‘हा’ निर्णय

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र पाकिस्तानविरुद्ध संताप दिसून येत आहे

जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. क्रीडा क्षेत्रातील जाणकार, क्रिकेट संघटना व चाहतेदेखील आपला रोष व्यक्त करत आहेत. सुरुवातीला मुंबईतील CCI क्लबने पाकिस्तानी खेळाडूचा फोटो हटवल्यानंतर मोहाली, राजस्थान, दिल्ली आणि कर्नाटक क्रिकेट संघटनांनीदेखील आपल्या स्टेडियम्समधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकले. मात्र BCCI च्या मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो किंवा आठवणी तशाच ठेवण्यात आल्या होत्या. ते आता हटवण्यात आले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र पाकिस्तानविरुद्ध संताप दिसून येत आहे. हा संताप प्रत्येकजण आपल्या पद्धतीने व्यक्त करत आहे. क्रिकेट संघटना आपल्या मुख्यालयातील आणि स्टेडियमधील पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो आणि इतर आठवणी हटवून आपला निषेध नोंदवत आहेत. पण असे असताना BCCI ने मात्र पाकिस्तानी खेळाडूंबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. टाईम्स नाऊ या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केलेल्या बॅट, त्यांचे फोटो आणि इतर आठवणी हल्ल्यानंतर ६ दिवसांनीही तशाच पद्धतीने जतन करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र BCCI ला उशिराने सुचलेल्या शहाणपणानंतर आता या सर्व गोष्टी हटवण्यात आल्या आहेत.

दरम्यान,या आधी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथील फिरोझशाह कोटला स्टेडियम, राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियम, पंजाब येथील मोहालीचे PCA स्टेडियम आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने बंगळुरूच्या स्टेडियमधून आणि मुख्यालयातून पाकिस्तानी खेळाडू आणि त्या संबंधित व्यक्तींचे फोटो हटवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 2:07 pm

Web Title: pulwama terror attack bcci takes down photos and memories of pakistan players
Next Stories
1 सय्यद मुश्ताक अली टी-20 : मुंबईचा सलग दुसरा विजय, पंजाबवर 35 धावांनी केली मात
2 ‘विराटने भारतासाठी जे केलं, ते मला पाकिस्तानसाठी करायचंय’
3 वन-डे आणि टी-20 संघात जागा मिळवण्याबाबत पुजारा अजुनही आशादायी
Just Now!
X