काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात ४१ जवान शहीद झाले. या नंतर सर्वत्र पाकिस्तानविरुद्ध रोष आणि संताप दिसून आला. याशिवाय या शहीद जवानांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल प्रत्येकाने सहानुभूती दर्शविली तसेच त्यांना शक्य ते सहकार्य केले. मात्र यता हल्ल्याबाबत असलेला संताप अजूनही कायम असून हाच संताप भारतीय सलामीवीर शिखर धवन याने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून शिखर धवनने एक कविता पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये धवन जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. अंगमेहनीतीचा सराव करताना त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओबरोबर त्याने प्रेरणादायी असा संदेश देखील कवितेच्या रूपाने लिहिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात उत्साह निर्मिती व्हावी असा कवितेतील प्रत्येक शब्द आहे. त्यामुळे आपल्या शत्रूविरुद्ध आपल्याला बळ मिळेल या उद्देशाने शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
“जीत की खातिर बस जूनून चाहिए;
जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए;
ये आसमां भी आयेगा ज़मीं पर;
बस इरादों में जीत की गूंज चाहिऐ।” अशा कवितेच्या ओळी आहेत.

दरम्यान, धवन हा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी कसून सराव आणि व्यायाम करत आहे. IPL आणि विश्वचषक स्पर्धेच्या आधी ही मालिका त्याच्यासाठी महत्वाची आहे.