News Flash

पुण्याचा दिल्लीवर सनसनाटी विजय

रंगतदार लढतीत पुणे सिटी क्लबने दिल्ली डायनामोज संघावर ४-३ अशी मात केली.

रंगतदार लढतीत पुणे सिटी क्लबने दिल्ली डायनामोज संघावर ४-३ अशी मात केली. त्यामुळे इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीची समीकरणे बदलणार आहेत.

शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या लढतीत किआन लेव्हिसने ४४व्या मिनिटाला दिल्ली संघास आघाडी मिळवून दिली होती. मात्र अनिबल रॉड्रिग्जने ५५व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. महंमद सिसोकोने ६२व्या मिनिटाला व अनिबलने पुन्हा ६३व्या मिनिटाला गोल करीत पुण्याला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुण्याचाच खेळाडू एडवर्ड फरेराकडून ७९व्या मिनिटाला स्वयंगोल झाला. माल्सावामझुलाने दिल्लीकडून ९१व्या मिनिटाला गोल करीत सामन्यातील रंगत वाढवली. परंतु आणखी गोल करण्यात दिल्लीला यश मिळाले नाही. पुण्याच्या खेळाडूंनी नंतर सुरेख बचाव करीत त्यांचे प्रयत्न असफल ठरवले.

या सामन्यातील विजयामुळे पुणे संघाने १५ गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दिल्ली संघापेक्षा दोन गुणांनी ते पिछाडीवर आहेत.

 

आज मुंबई-केरळ समोरासमोर

मुंबई : मुंबई सिटी एफसी आणि केरळा ब्लास्टर्स हे इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. घरच्या मदानावरील मुंबईची खराब कामगिरी केरळासाठी जमेची बाजू आहे.

मुंबईला यंदा आतापर्यंत घरच्या मदानावर चारपकी एकच सामना जिंकता आला. याचप्रमाणे त्यांना घरच्या मदानावर आतापर्यंत केवळ दोन गोल केले आहेत. महत्त्वाच्या खेळाडूंना गोल करण्यात आलेले अपयश ही मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्यासाठी सर्वाधिक चिंताजनक बाब ठरली आहे. ते म्हणाले की, ‘‘आमच्याकडे सर्व क्षेत्रांत उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. संयम बाळगणे महत्त्वाचे असेल. फुटबॉलमध्ये असे घडते. या खेळाडूंच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना संधी मिळाली होती. त्यामुळे ते लवकरच त्याचे रूपांतर गोलमध्ये करतील.’’

मुंबई १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या सहा सामन्यांत मात्र त्यांना केवळ तीनच गोल करता आले आहेत. केरळा १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:24 am

Web Title: pune beat delhi in indian super league
Next Stories
1 बरोबरीची कोंडी सुटेना..
2 कॉलिनचा पदार्पणातच बळींचा षटकार
3 ‘तिरक्या’ चालींमुळे खेळाडूंचे नुकसान
Just Now!
X