11 August 2020

News Flash

पुणे, जळगाव, नागपूरची विजयी सुरुवात

पुणे अ‍ॅटॅकर्स, जळगाव बॅटलर्स व नागपूर रॉयल्स यांनी आपापले सामने जिंकून पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये विजयी सुरुवात केली. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू झालेल्या या

| April 25, 2013 03:48 am

पुणे अ‍ॅटॅकर्स, जळगाव बॅटलर्स व नागपूर रॉयल्स यांनी आपापले सामने जिंकून पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये विजयी सुरुवात केली. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पुणे संघाने ठाणे कॉम्बटंट्स संघाचा ३.५-२.५ असा पराभव केला. विजयी संघाकडून हिमांशू शर्मा, अक्षयराज कोरे व एम. ललित बाबू यांनी विजय मिळविला. ठाणे संघाकडून अपेक्षेप्रमाणे सूर्यशेखर गांगुली व आदित्य उदेशी यांनी डाव जिंकले.
जळगावने मुंबई मूव्हर्स संघाचा ५-१ असा दणदणीत पराभव केला, त्याचे श्रेय श्रीनाथ नारायण, सुनीलदत्त नारायण, ईशा करवडे व समीर कठमाळे यांनी मिळविलेल्या विजयास द्यावे लागेल. नागपूर संघाने अहमदनगर चेकर्सला ४-२ असे पराभूत केले. नागपूर संघाकडून सहज ग्रोव्हर, तेजस बाक्रे व सौम्या स्वामीनाथन यांनी डाव जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2013 3:48 am

Web Title: pune jalgaon nagpur starts with win
टॅग Jalgaon
Next Stories
1 दर्शन!
2 सचिन.. एक वेगळं रसायन!
3 सचिन तेंडुलकर नावाचं क्रिकेटचं विद्यापीठ
Just Now!
X