25 November 2020

News Flash

पुणे, नागपूर उपांत्य फेरीत

पुणे, जळगाव, नागपूर व अहमदनगर यांनी पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीगमध्ये उपांत्य फेरी गाठली. ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी

| April 27, 2013 03:29 am

पुणे, जळगाव, नागपूर व अहमदनगर यांनी पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीगमध्ये उपांत्य फेरी गाठली. ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी आयोजित केली आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी गटात पुणे अ‍ॅटॅकर्सने १७.५ गुणांसह आघाडी स्थान घेतले. जळगाव बॅटलर्सने १७ गुणांसह दुसरे स्थान घेतले. नागपूर रॉयल्स (१६.५ गुण) व अहमदनगर चेकर्स (१४) यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पाचव्या फेरीत पुण्याने नागपूरला ३.५-२.५ अशा गुणांनी हरविले. या लढतीत नागपूरकडून खेळणाऱ्या सौम्या स्वामीनाथन हिने पुण्याच्या अक्षयराज कोरे या बलाढय़ खेळाडूला हरविले, तर पुण्याच्या स्वाती घाटे-तेली हिने नागपूरच्या स्वप्नील धोपाडे याला चकित
केले.
सूर्यशेखर गांगुली याचा समावेश असलेल्या ठाणे कॉम्बॅटंट्स संघाला मुंबई मूव्हर्सविरुद्ध २.५-३.५ अशी हार पत्करावी लागली. हा सामना गमावल्यामुळे ठाण्यास बाद फेरीत प्रवेश करता आला नाही.
पाचव्या फेरीचे निकाल
१.नागपूर पराभूत वि.पुणे (२.५-३.५)-तेजस बाक्रे बरोबरी. वि. पद्मिनी राऊत, श्वेता गोळे पराभूत वि. एम. ललितबाबू, सहज ग्रोव्हर बरोबरी वि. अमरदीप बारटक्के, चिन्मय कुलकर्णी बरोबरी वि. हिमांशु शर्मा, स्वप्नील धोपाडे पराभूत वि. स्वाती घाटे. सौम्या स्वामीनाथन वि.वि. अक्षयराज कोरे.
२.अहमदनगर पराभूत वि. जळगाव (२.५-३.५) एम. व्यंकटेश वि.वि. समीर कठमाळे, ऋचा पुजारी पराभूत वि. विदित गुजराथी, जी.एन.गोपाळ वि.वि. मीनाक्षी सुब्ररामन, तानिया सचदेव पराभूत वि. एस.एल.नारायणन, शार्दूल गागरे बरोबरी वि. ईशा करवडे, सागर शहा पराभूत वि. श्रीनाथ नारायण.
३.मुंबई वि.वि. ठाणे (३.५-२.५) अरुण प्रसाद वि.वि. प्रथमेश मोकल, शशिकांत कुतवळ पराभूत वि. सूर्यशेखर गांगुली, अश्विन जयराम वि.वि. एस.मीनाक्षी, कृत्तिका नाडिग पराभूत वि. मेरी अ‍ॅन गोम्स, राकेश कुलकर्णी वि.वि. अभिमन्यू पुराणिक, के.मनीषा मोहंती बरोबरी वि. आदित्य उदेशी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:29 am

Web Title: pune nagpur in semi final round
टॅग Sports
Next Stories
1 सिंधूची आगेकूच, पानतावणेचे आव्हान संपुष्टात
2 कबड्डी विकास आघाडी आणि त्रि-मूर्ती
3 उबेर-थॉमस बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार
Just Now!
X