28 January 2021

News Flash

पुणे वॉरियर्सचे सामने गहुंजेतच होणार!

सहारा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यातल्या वादामुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पुणे वॉरियर्सचे सामने कुठे होणार, असा प्रश्न उभा राहिला होता. मात्र बीसीसीआयमधील सूत्रांनुसार पुणे वॉरियर्सचा

| March 10, 2013 01:11 am

सहारा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यातल्या वादामुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पुणे वॉरियर्सचे सामने कुठे होणार, असा प्रश्न उभा राहिला होता. मात्र बीसीसीआयमधील सूत्रांनुसार पुणे वॉरियर्सचा संघ घरचे सामने गहुंजे येथील मैदानावरच खेळेल. ३ एप्रिल ते २६ मे दरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या सहाव्या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. त्यानुसार गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर पुणे वॉरियर्सचे सामने होणार आहेत. या स्टेडियमचे पूर्वीचे नाव सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम असे होते. घरच्या मैदानावर पुणे वॉरियर्सचा पहिला मुकाबला ७ एप्रिलाला किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या मैदानाच्या नावावरून सहारा समूह आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमच्या सुरुवातीलाच लिहिलेले सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम हे नाव कपडय़ाच्या साह्य़ाने झाकून टाकले होते. या वादामागे कराराप्रकरणी पैसा न देण्याच्या मुद्दय़ावरून हा वाद झाला होता.
याप्रकरणी सहारा समूहाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सहाराला आपल्या संघाचे सामने पुण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी आयोजित करायचे होते. आयपीएलच्या सहाव्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयला याप्रकरणी असलेला तिढा सोडवणे आवश्यक होते.
दरम्यान आयपीएलचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने या मुद्दय़ावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र पुणे वॉरियर्सच्या सामन्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असे छापण्यात आले आहे.

आयपीएलचे सामने रायपूर आणि रांचीमध्येही
रायपूरचा संघ नसूनही आयपीएलचे काही सामने रायपूर आणि रांचीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ घरच्या सामन्यांपैकी दोन सामने रायपूर येथे खेळणार आहे तर कोलकाता नाइट रायडर्स घरच्या सामन्यांपैकी काही सामने रांची येथे खेळणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे सर्व घरचे सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथेच होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2013 1:11 am

Web Title: pune warrior ipl match held at gahunje
टॅग Ipl,T20 Cricket
Next Stories
1 इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर
2 श्रीलंकेचा धावांचा डोंगर
3 छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिलांमध्ये मुंबई, पुण्याची अस्मिता पणाला
Just Now!
X