फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील अखेरच्या  सामन्यातसुद्धा दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्या क्रिकेटरसिकांना विजयाची भेट देण्यात अपयश आले. किंग्ज इलेव्हन पंजाबने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करीत दिल्ली जिंकण्याची किमया साधताना ४ विकेट आणि २ चेंडू राखून विजय मिळवला. पंजाबच्या वीरेंद्र सेहवाग (२३) आणि मनन व्होरा (४२) यांनी ६७ धावांची दमदार सलामी नोंदवली. परंतु त्यानंतर ठराविक अंतराने पंजाबचे फलंदाज बाद झाल्यामुळे त्यांची ५ बाद १२७ अशी अवस्था झाली. पण अक्षर पटेलने ३५ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ४२ धावा काढून पंजाबच्या विजयाचा अध्याय लिहिला. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार ठोकून रिशी धवनने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, दिनेश कार्तिकने ४४ चेंडूंत साकारलेल्या ६९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ७ बाद १६४  धावा उभारल्या. दिल्ली आणखी मोठी धावसंख्या साकारता आली असती. १७व्या षटकात २ बाद १४० अशा सुस्थितीतील दिल्लीचे पाच फलंदाज फक्त १८ धावांत तंबूत परतले. कर्णधार केव्हिन पीटरसनने ३२ धावांत ४९ धावा केल्या. कार्तिक- पीटरसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने ३५ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफ लक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकोंत ७ बाद  १६४ (दिनेश कोर्तिक ६९, के व्हिन पीटरसन ४९; संदीप शर्मा ३/३५) पराभूत वि. किं ग्ज इलेव्हन पंजाब : १९.४ षटकोंत ६ बाद १६५ (वीरेंद्र सेहवाग २३, मनन व्होरा ४२, अक्षर पटेल नाबाद ४२; इम्रान ताहीर ३/२२)
सामनावीर : अक्षर पटेल.