जेसन जरकिरत सिंग संघा हे नाव आहे १९ वर्षाखालील ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराचे. आणि नावावरून दिसून येतेय त्याप्रमाणे जेसनचे भारताशी एक खास नाते आहे. भरताविरुद्ध आज ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणाऱ्या जेसनचे वडील मुळचे भारतीय आहेत.

पंजाबमधील नवानसाहार येथील लोधीपूर गावात जेसनचे वडील कुलदीप यांचा जन्म झाला. जेनच्या आई सिल्वासा यांचे आजोबा राम सिंग १९२०च्या दशकात शेती करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. त्यानंतर तिथेच त्यांच्या पुढील पिढ्या स्थायिक झाल्या. तर दुसरीकडे कुलदीप १९८०च्या सुमारास उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. ते एक उत्तम अॅथलिट होते. या खेळाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांना ते जमले नाही पण आत त्याचे स्वप्न त्यांचा मुलगा जेसन पूर्ण करत आहे.

डिसेंबर महिन्यात १९ वर्षाखाली संघाच्या कर्णधारपदी जेसनची निवड झाल्यानंतर सिल्वासा आणि कुलदीप यांच्या न्यु कॅसल येथील घरी नातेवाईकांच्या भेटी आणि शुभेच्छांचे सत्रच सुरु झाले. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणारा जेसन हा भारतीय वंशाचा पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. सध्या सिल्वासा आणि कुलदीम न्यू कॅसलमध्ये राज कॉर्नर्स नावाचे हॉटेल चालवतात. आपल्या मुलाने क्रिकेटच्या श्रेत्रात आणखीन मोठे व्हावे अशीच या दोघांची इच्छा आहे.

कडा लक्ष वेधून घेतो

अनेकदा जेसनच्या उजव्या हातातील कडं भारतीयांचे लक्ष वेधून घेतो. एखाद्या सामान्य पंजाबी कुटुंबातील मुले घालतात त्याप्रमाणे जेसनच्याही उजव्या हातातील कडं तो क्षेत्ररक्षण करताना दिसून येतो. हे कडं कनेक्शनमुळे त्याचे पंजाबमधील मूळ दिसून येते असे नेटकरी म्हणतात.