फलंदाजांनो, आपला खेळ उंचावून सातत्याने मोठी धावसंख्या धावफलकावर झळकवा. मगच झगडणारा भारतीय संघ परदेशात आपला प्रभाव पाडू शकेल, असा कानमंत्र अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानने दिला आहे. नुकतीच इंग्लंडने भारताविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. यापैकी दोन सामने तीन दिवसांमध्ये संपले. याबाबत झहीर म्हणाला, ‘‘पहिल्या डावात फलंदाजांनी ३५० धावा उभारल्या, तर तुम्ही लढत देऊ शकता, असे मला नेहमी वाटते. जर हे तुम्हाला शक्य झाले नाही, तर सामन्यात तुम्हाला झगडावे लागते.’’
‘‘आपण परदेशात जे काही यश मिळवले होते, त्याचे श्रेय फलंदाजांच्या मोठय़ा धावसंख्येला जाते. त्यानंतरच गोलंदाजांना बळी मिळवून विजय मिळवता आला आहे,’’ असे तो पुढे म्हणाला. आगामी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी२० क्रिकेट स्पध्रेत आपण खेळू शकणार नसल्याचे संकेत झहीरने या वेळी दिले. परंतु लवकरच मैदानावर परतू शकेन, असा आशावाद मात्र त्याने प्रकट केला. ‘‘माझे शरीर कशा प्रकारे साथ देते हे मला महत्त्वाचे वाटते. मी माझ्या गोलंदाजीमुळे सर्वप्रथम स्वत:चे समाधान करू शकलो, तरच मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि दडपण हाताळू शकेन आणि त्यानंतरच मी पुनरागमनाचा विचार करेन,’’ असे झहीरने सांगितले. झहीर आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ९२ कसोटी आणि २०० एकदिवसीय सामने खेळला आहे.
वानखेडे स्टेडियमवर ३ मे रोजी मुंबई इंडियन्सकडून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलचा सामना खेळत असताना झहीरला दुखापत झाली.
लॉर्ड्सवरील विजयानंतर इशांत शर्माला दुखापत झाली. त्यामुळे भारतावरील दडपण वाढले. याबाबत झहीर म्हणाला, ‘‘मोठय़ा कसोटी मालिकेत जर कोणी चांगली गोलंदाजी करू शकला, तर त्याचा मोठा प्रभाव पडतो. नेमकी हीच गोष्ट भारतीय संघात अभावाने जाणवते. भारताची संपूर्ण गोलंदाजीची फळी ही नवखी होती. या परिस्थितीत प्रत्येकाने स्वत:चे व्यवस्थापन चांगले राखणे महत्त्वाचे ठरते.’’
व्हेटोरी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार
वेलिंग्टन : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी२० क्रि के ट स्पध्रेत न्यूझीलंडचा माजी क र्णधार डॅनियल व्हेटोरी नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट प्रोव्हिन्से संघाचे प्रतिनिधित्व क रणार आहे. ३५ वर्षीय व्हेटोरीच्या जमैकोच्या संघाचे कॅ रेबियन प्रीमियर लीगमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे तो या संघाक डून खेळणार आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरे अँडरसन नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाक डून खेळण्यासाठी अनुपलब्ध आहे. परंतु तो आपला आयपीएलचा संघ मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व क रणार आहे. नॉर्दर्न डिस्ट्रिक्टचा संघ अद्याप निश्चित झाला नसला तरी स्कॉट स्टायरिस, के न विल्यम्सन, टिम साऊ दी, ट्रेंट बोल्ट, बी जे वॉटलिंग आणि डॅनियल फ्लिन यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.