22 February 2019

News Flash

थायलंड ओपन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

कश्यप, प्रणॉयचं आव्हान मात्र संपूष्टात

पी. व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिनवर २१-१६, २१-१४ अशी मात केली. पुढच्या फेरीत सिंधूसमोर अमेरिकन खेळाडू सोनिया चिह हिचे आव्हान असणार आहे. मात्र दुसरीकडे परुपली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांना मात्र पराभवास सामोरे जावे लागले.

पुरुषांच्या एकेरीत कश्यप याला जपानच्या कांता त्सुनियामा याच्याकडून १८-२१, २१-१८, १९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या मानांकित एच.एस.प्रणॉयला इंडोनेशियाच्या सोनीद्वे कुन्कोरो याने २१-१८, २१-१४ असे पराभूत केले. दुहेरीत मनू अत्री व बी.सुमेध रेड्डी यांना हिरोयोकी इन्दो व युता वातानाबे यांच्याकडून २४-२२, १३-२१, १९-२१ अशी हार मानावी लागली. मिश्र दुहेरीत जपानच्या युकी कानेको व व मोयू मत्सुमोतो यांनी सात्त्विकसाईराज रान्किरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांना २१-११, २१-१६ असे पराभूत केले.

First Published on July 12, 2018 11:00 pm

Web Title: pv sindhu enters quarterfinals of thailand open
टॅग P V Sindhu