01 March 2021

News Flash

ऑल इंग्लंड ओपन : पी.व्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर केली मात

पी. व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर तिने २१-१२, १३-२१, २१-१८ अशा सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सिंधूने उत्तम खेळ करत तो सेट जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिचा खेळ काहीसा कमी पडला. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करत तिने जिंदापोलला नमवले आणि उपांत्यापूर्व फेरीत धडक मारली.

मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज आहे हे मी जाणून आहे. आजचा सामना जिंकून मी उपांत्यफेरीत धडक मारली याचा आनंदही वाटतो आहे. आता पुढच्या सामन्यात माझी प्रतिस्पर्धी कोण असेल याचा विचार मी फारसा करत नाहीये. मी फक्त माझा खेळ आणखी चांगला करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कदाचित माझा सामना इंडोनेशियाच्या नोझोमी ओकुहरा सोबत होऊ शकतो असा अंदाज सिंधूने सामना संपल्यावर व्यक्त केला.

नित्चाओन जिंदापोलबाबत सिंधू म्हणाली की ती एक चांगली बॅडमिंटनपटू आहे. सुरुवातीला तिने मला काही इझी पॉईंट्स दिले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिने कमाल केली. असे असले तरीही मी तिसऱ्या सेटमध्ये माझी कौशल्ये पणाला लावली आणि तो सेट जिंकून विजय मिळवला असेही सिंधूने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 7:04 am

Web Title: pv sindhu enters quarters of all england championship
Next Stories
1 नेपाळला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा
2 बीसीसीआयचे पदाधिकारी अधिकारपदापासून बेदखल!
3 महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्यपदक
Just Now!
X