22 September 2020

News Flash

पी.व्ही.सिंधूने पटकावले मलेशियन ओपनचे जेतेपद

सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी आहे.

ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील सिंधूचे हे पाचवे विजेतेपद आहे.

मलेशिया मास्टर ग्रांपी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजेतेपद पटकावले आहे. सिंधूचे हे या वर्षातील पहिले विजेतेपद आहे.
सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमॉरचा २१-१५,२१-९ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पहिल्या गेमध्ये ग्लिमोरने सिंधूचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱया गेममध्ये सिंधू ग्लिमोरला प्रतिकाराची कोणतीही संधी मिळू न देता विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी आहे. ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील सिंधूचे हे पाचवे विजेतेपद आहे. याआधी तिने ही स्पर्धा मलेशियात २०१३ साली जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत २०१३ ते २०१५ अशी हॅटट्रिक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2016 3:39 pm

Web Title: pv sindhu starts 2016 with malaysia masters badminton crown
टॅग Badminton,Pv Sindhu
Next Stories
1 ऑस्ट्रेलियन भूमीवर अखेर विजयाचे सूर्यदर्शन
2 सासऱ्यांच्या अपघातामुळे मरेचा विजय झाकोळला
3 टेनिसला काळीमा!
Just Now!
X