कश्यपचे आव्हान संपुष्टात
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत थायलंडच्या रॅटचानोक इंटानोनचा पराभव करून विजयी कूच केली, तर पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यपचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने महिला एकेरीत माजी विश्वविजेत्या इंटानोनवर एक तास ९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१९, २१-२३, २१-१३ असा विजय साजरा केला. राष्ट्रकुल स्पध्रेतील पदक विजेत्या कश्यपला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. हाँगकाँगच्या वेई नानने कश्यपवर १७-२१, २१-१६, २१-१८ असा एका तासात विजय मिळवला.
ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या अनुपस्थितीत महिला दुहेरीची मदार सांभाळणाऱ्या प्रज्ञा गद्रे व सिक्की रेड्डी यांनीही निराश केले. जपानच्या शिझुका मात्सुओ व
मामी नैटो या जोडीने भारतीय खेळाडूंचा २६-२४, २१-९ असा पराभव केला.