विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागंलं. या पराभवासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं. गुणतालिकेत टीम इंडिंयाची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ ६८.३ टक्केंसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. ७० टक्केसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे. इंग्लंडनं भारताचा पराभव करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गणितं बदलली आहेत. ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा WTC गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळालं. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल दोन संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सामना होणार आहेत. चेन्नई कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ट्विट करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची काही समीकरणं सांगितली आहेत. आयसीसीनं सांगितलेल्या समिकरणानुसार भारतीय संघ अद्याप कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळू शकतो. त्यासठी भारतीय संघाला इंग्लंडचा २-१ किंवा ३-१ नं पराभव करावा लागणार आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : २२ वर्षानंतर इंग्लंडनं भारताच्या गडाला लावला सुरुंग

इंग्लंड संघाला अंतिम फेरीत फोहचण्याचीही भारतीय संघाला ३-०, ३-१ किंवा ४-० ने पराभूत करावं लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी इंग्लंड-भारत मालिकेवर अवलंबून राहवं लागेल. त्यानुनासर इंग्लंडला एकपेक्षा जास्त पराभव होऊ नये. जर इंग्लंडनं भारताचा १-०,२-० किंवा २-१ नं पराभव केल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहचेल. १-१ किंवा २-२ ने मालिका बरोबरीत सुटल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे….