मुंबईतील पाच शालेय मुलांना इंग्लिश प्रीमिअर लीगमधील संघ क्वीन्स पार्क रेंजर्सच्या सराव केंद्रात २१ दिवस प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. मिलिंद देवरा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील शानदार कामगिरीनंतर रुडॉल्फ डिसुझा, अरफत अन्सारी, तनय शाह, उझीर अन्सारी आणि प्रफुल्ल कुमार या पाचजणांना क्वीन्स पार्क रेंजर्सच्या सरावकेंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. गेल्या तीन सत्रांतले हे पाच खेळाडू आहेत. २००९ मध्ये प्रायोगिक तत्वावर आम्ही हा उपक्रम राबवला होता. त्यावेळी आम्ही दोन मुलांना प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवले होते. त्यापैकी शॉन फर्नाडिझ सध्या भारतीय १९ वर्षांखालील फुटबॉल संघाचा भाग असल्याचे देवरा यांनी सांगितले.