भारतीय गोलंदाज आर अश्विनच्या जागी संघात हरभजन सिंगची वर्णी लागल्याचे वृत्त आहे. कानपूर येथील ग्रीन पार्कमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये एकदिवसीय सामना सुरु आहे. त्यादरम्यान, आर अश्विनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी हरभजन सिंगला पुढील सामन्यांमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. अश्विनला दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेला रविवारी सुरुवात झाली असून कानपूर येथे पहिला सामना सुरु आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ए बी डिव्हिलियर्स धडाकेबाज शतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ३०४ धावांचे आव्हान दिले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 3:52 pm