26 May 2020

News Flash

IPL 2020 : अश्विनने दिलं फलंदाजांना ‘ओपन चॅलेंज’

IPL 2019 मध्ये अश्विन-बटलर मंकड रन-आऊटचा वाद गाजला होता...

IPL 2020 साठी १९ डिसेंबरला लिलाव प्रक्रीया पार पडली. त्यात परदेशी खेळाडू मालामाल झाले. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याला सर्वाधिक १५ कोटी ५० लाखांच्या बोलीसह कोलकाता संघाने खरेदी केले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर पियुष चावला हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह संघात सामील करून घेतले. IPL ला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरूवातीच्या आठवड्यात प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेआधीच भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने फलंदाजांचे खुलं आव्हान दिलं आहे.

Video : ‘फायरफायटर’ मॅक्सवेल! स्टेडिअमबाहेर लागली आग अन्…

काय आहे अश्विनचं ‘चॅलेंज’

अश्विनने ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #askash या दरम्यान त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना झकास उत्तरे दिली. त्यात एका चाहत्याने त्याला सवाल केला, “तू IPL 2020 मध्ये कोणकोणत्या फलंदाजांना ‘मकंड’ पद्धतीने धावबाद करशील?” त्यावर अश्विनने दमदार उत्तर दिले. “जो-जो खेळाडू मी गोलंदाजी करत असताना धाव काढण्यासाठी आधीच क्रीजच्या बाहेर जाईल, त्या प्रत्येक फलंदाजाला मी मकंड पद्धतीने धावबाद करेन”, असे उत्तर अश्विनने दिले. या उत्तराद्वारे त्याने एकप्रकारे फलंदाजांना खुलं आव्हानचं दिलं की मी गोलंदाजी करत असताना तुम्ही धाव घेण्यासाठी आधीच क्रीजच्या बाहेर गेलात तर तुमची खैर नाही…

IPL 2020 : ‘या’ तारखेपासून होणार सुरूवात; पहिला सामना वानखेडेवर

IPL 2019 मध्ये अश्विनने बटलरला मंकड पद्धतीने केलं होतं धावबाद

राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या २ संघांमध्ये सामना सुरु होता. राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले होते. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला अश्विनने मंकड पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजी करताना चेंडू टाकण्याआधीच त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले.

अश्विनने अशा प्रकारे बटलरला धावबाद केल्यामुळे त्याच्यावर काहींनी टीका केली, तर काहींनी नियमांचा दाखला देत त्याच्या कृत्याचे समर्थन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 12:34 pm

Web Title: r ashwin ipl 2020 i will mankad anyone who goes out of crease jos buttler video vjb 91
Next Stories
1 Video : ‘फायरफायटर’ मॅक्सवेल! स्टेडियमबाहेर लागली आग अन्…
2 IPL 2020 : ‘या’ तारखेपासून होणार सुरूवात; पहिला सामना वानखेडेवर
3 Ranji Trophy : लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईच्या संघात बदल, ‘या’ खेळाडूला संधी
Just Now!
X