मुंबई : शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत महिलांच्या गटात ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालयाने तर व्यावसायिक पुरुषांच्या गटात मध्य रेल्वेने विजेतेपद पटकावले.

रा. फ. नाईक विद्यालयाने ठाण्याच्याच शिवभक्त विद्यालयाचा १५-१२ असा तीन गुणांनी पराभव केला. प्रियांका भोपी हिच्या संरक्षणामुळे हा सामना जादा डावात खेळवण्यात आला. जादा डावात रा. फ. नाईकने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद प्राप्त केले. विजयी संघाकडून पौर्णिमा सकपाळ हिने ३.४० आणि नाबाद ३.२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात दोन गडी बाद केले. तिला रुपाली बडे हिने २.००, ३.०० आणि २.१० मिनिटे संरक्षण करून चांगली साथ दिली. प्रणाली मगर हिनेही २.००, ३.०० आणि २.१० मिनिटे संरक्षण करत विजयात योगदान दिले. शिवभक्तच्या प्रियांकाने २.१०, नाबाद ४.४० आणि २.३० मिनिटे संरक्षण करतानाच आक्रमणात चार गडी बाद केले. रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा ९-५ असा पराभव करून तिसरा क्रमांक प्राप्त केला.

south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
South East Central Railway Invites Applications To Fill Over 700 Apprentice Positions
Job Alert: रेल्वे विभागात बंपर भरती; दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज
Mpsc Mantra General Science Question Analysis career
Mpsc मंत्र: सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

पुरुषांमध्ये मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा १५-१३ असा दोन गुण व एक मिनिट राखून पराभव केला. मध्य रेल्वेकडून दीपेश मोरेने २.०० आणि २.१० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात पाच गडी मिळवून छाप पाडली. १.१५ आणि १.२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद करणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या रंजन शेट्टीची झुंज व्यर्थ ठरली. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा मान पौर्णिमा सकपाळ (रा. फ. नाईक) आणि दीपेश मोरे (मध्य रेल्वे) यांनी पटकावला. सर्वोत्तम संरक्षक म्हणून रुपाली बडे आणि मिलिंद चावरेकर यांना तर सर्वोत्तम आक्रमक खेळाडू म्हणून मनोरमा शर्मा आणि रंजन शेट्टी यांना गौरविण्यात आले.