News Flash

मँचेस्टर सिटीच्या विजयात लॅम्पार्ड चमकला

फ्रँक लॅम्पार्डच्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत सदरलँडवर ३-२ असा निसटता विजय मिळवला.

| January 2, 2015 02:15 am

फ्रँक लॅम्पार्डच्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत सदरलँडवर ३-२ असा निसटता विजय मिळवला.
सलग दुसऱ्या आठवडय़ात मँचेस्टर सिटीने २-० अशी आघाडी मिळवली, मात्र सदरलँडने शानदार पुनरागमन करत बरोबरी केली. मात्र लॅम्पार्डने ७३व्या मिनिटाला गोल करत सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याया टौरूने ५७व्या मिनिटाला पहिला गोल केला. स्टीव्हन जोव्हेटिकने ६६व्या मिनिटाला दोन गोल करत सिटीला भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र सदरलँडतर्फे जॅक रोडवेलने ६८व्या तर अ‍ॅडम जॉन्सनने ७१व्या मिनिटाला गोल करत बरोबरी करून दिली. मात्र लॅम्पार्डने सदरलँडचे विजयाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. या विजयासह सिटीने ४६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थान पटकावले आहे. चेल्सी अव्वल स्थानी आहे. मँचेस्टर युनायटेड स्टोक सिटी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. साऊदॅम्पटनने अर्सेनेलवर २-० अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:15 am

Web Title: radamel falcao equalizer saves manchester united f c at stoke city
Next Stories
1 विश्वचषक २०१५: कसा असावा टीम इंडियाच्या मधल्या फळीचा ‘चेहरा’?
2 विश्वचषक २०१५: टीम इंडियाची सलामी जोडी कोण?
3 धोनी खेळाडू म्हणून संघात हवा होता!
Just Now!
X