गुडघ्याच्या गंभीर दुखापतीनंतर परतलेल्या राफेल नदालने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत आगेकूच केली. दुखापतीतून सावरल्यानंतर चौथी स्पर्धा खेळत असलेला नदाल सामन्यासाठी सराव करत होता. त्याचवेळी प्रतिस्पर्धी खेळाडू लिआनाडरे मेयर पाठीच्या दुखण्यामुळे माघार घेत असल्याने नदालने पुढच्या फेरीत आगेकूच केली. ही वाईट बातमी आहे. मेयरसाठी तसेच टेनिसरसिकांसाठी ही निराशेची गोष्ट आहे. दरम्यान इंडियन वेल्सचा परिसर भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ एवढी जाणवली. ‘भूकंपाने मी खूपच घाबरलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच भूकंप अनुभवत होतो’ असे नदालने सांगितले.