News Flash

नदाल, अझारेन्काचे संघर्षपूर्ण विजय

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवरचे आपले प्रभुत्व सिद्ध करत राफेल नदालने लागोपाठ दुसऱ्या दिवशीही विजय मिळवला. नदालने इटलीच्या फॅबिओ फॉगिनिनीवर ७-६ (५), ६-४, ६-४ असा

| June 2, 2013 03:45 am

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवरचे आपले प्रभुत्व सिद्ध करत राफेल नदालने लागोपाठ दुसऱ्या दिवशीही विजय मिळवला. नदालने इटलीच्या फॅबिओ फॉगिनिनीवर ७-६ (५), ६-४, ६-४ असा विजय मिळवला. व्हिक्टोरिया अझारेन्काला कडव्या संघर्षांला सामोरे जावे लागले तरी रशियाच्या मारिया शारापोव्हाने सहज विजय मिळवत आगेकूच केली.
अझारेन्काने अलिझ कॉर्नेटवर संघर्षपूर्ण विजय मिळवत तर शारापोव्हाने झेंग जिला नमवत चौथी फेरी गाठली. अझारेन्काला विजयासाठी संघर्ष करावा लागला. अझारेन्काने फ्रान्सच्याच कॉर्नेटचा ४-६, ६-३, ६-१ असा पराभव करत चौथ्या फेरीत मजल मारली. शारापोव्हाने चीनच्या झेंगला ६-१, ७-५ असे पराभूत केले.
पुरुषांमध्ये जपानच्या केई निशिकोरीने अंतिम सोळात धडक मारली. निशिकोरीने फ्रान्सच्या बेनाइट पेअरला ६-३, ६-७ (३), ६-४, ६-१ असे नमवत चौथी फेरी गाठली.रिचर्ड गॅसक्वेटने निकोलाय डेव्हडेन्कोचा ६-४, ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला.

भारतीय टेनिसपटूंसाठी पराभवाचा दिवस
भारतीय टेनिसपटूंसाठी स्पर्धेतील शनिवारचा दिवस अपयशी ठरला. लिएण्डर पेस व त्याचा ऑस्ट्रियाचा साथीदार जर्गेन मेल्झर यांना दुसऱ्या फेरीत उरुग्वेच्या पाब्लो क्युवेअस आणि अर्जेटिनाच्या होरासिओ झेबालोस जोडीने पेस-मेल्झर जोडीकडून ५-७, ६-४, ७-६ (६) असे पराभूत व्हावे लागले. महेश भूपती आणि त्याची साथीदार केसये डेलाक्युआ जोडीचे आव्हान सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या सँटियागो गोन्झालेझ आणि ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनास्टासिया रोडिओनोव्हा जोडीने ६-४, १-६, ११-९ असे संपुष्टात आणले. रोहन बोपण्णा-अ‍ॅशलेह बार्टी जोडीला ल्युसी राडेका-फ्रान्टिसेक सरमाक जोडीने ६-४, ६-४ असे हरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 3:45 am

Web Title: rafael nadalazarenka win at french open
टॅग : Rafael Nadal,Tennis
Next Stories
1 बुद्धिबळ : भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्सना पराभवाचे धक्के
2 आयपीएल स्पॉट फिक्सिंग: विंदूने केला होता अॅडम गिलख्रिस्ट, मनप्रित गोनीशी मैत्रीचा प्रयत्न
3 खेळ म्हणून तिरंदाजीची ओळखच नाही -दीपिका
Just Now!
X