News Flash

‘द वॉल’ च्या शिरपेचात आणखी एक बहुमान, सचिनला मागे टाकत ठरला सर्वोत्तम कसोटीपटू

५२ टक्के लोकांची द्रविडला पसंती

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने आयुष्यभर द वॉल हे बिरुद मिरवलं. आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भक्कम बचाव यासाठी राहुल द्रविड ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर राहुलने भारताच्या १९ वर्षाखालील संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं. सध्या तो बंगळुरुस्थित (NCA) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला कधीही पुरेसं श्रेय मिळत नाही अशी अनेकदा चर्चा रंगत असते. मात्र Wisden India ने सोशल मीडियावर घेतलेल्या पोलमध्ये राहुल द्रविड गेल्या ५० वर्षातला भारताचा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला आहे.

Wisden India च्या सोशल मीडिया पेजवर घेण्यात आलेल्या या पोलमध्ये ११ हजार पेक्षा जास्त लोकांनी आपली मतं नोंदवली. यात ५२ टक्के लोकांनी राहुलच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तर ४८ टक्के लोकं ही सचिनच्या बाजूने होती.

१६ भारतीय खेळाडूंनिशी Wisden India ने हा पोल सुरु केला होता. ज्यात राहुल आणि सचिनसह विराट, सुनिल गावसकर अशा दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. गावसकर यांनी या पोलमध्ये विराटवर मात करत तिसरं स्थान पटकावलं आहे. आपल्या कारकिर्दीत राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा त्याचप्रमाणे राहुलने या पोलमध्येही अखेरपर्यंत लढा देत बाजी मारल्याचं Wisden India ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 1:22 pm

Web Title: rahul dravid beats sachin tendulkar in wisden poll on greatest indian test batsman psd 91
Next Stories
1 गांगुलीच्या जागी गंभीरला कर्णधार बनवल्यावर शाहरूख म्हणाला होता…
2 Video : जोकोविचने आधी केला पार्टीत डान्स मग आढळला करोना पॉझिटिव्ह
3 २२ युवा नौकानयनपटू उत्तेजक चाचणीत दोषी
Just Now!
X