05 March 2021

News Flash

हितसंबंधांच्या आरोपावरुन BCCI ची राहुल द्रविडला नोटीस, सौरव गांगुली भडकला

आर्थिक हितसंबंधाच्या आरोपावरुन नोटीस

बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला, BCCI च्या लोकपालांनी नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे तक्रार केली होती, या तक्रारीत द्रविडवर हितसंबंध जपल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरुन बीसीसीआयचे लोकपाल, निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीस बजावली आहे.

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदासोबत, इंडियन सिमेंट उद्योग समुहात उपाध्यक्ष पदावर काम करतोय. इंडियन सिमेंट उद्योग समुहाचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ आयपीएलमध्येही खेळतो. याच मुद्द्यावरुन संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या लोकपालांकडे तक्रार केली आहे. “दाखल झालेल्या तक्रारीवरुन द्रविडला नोटीस पाठवण्यात आली असून त्याला उत्तर देण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. द्रविडने आपलं उत्तर पाठवल्यानंतर पुढची पावलं उचलली जातील.” डी.के.जैन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

१६ ऑगस्टपर्यंत राहुल द्रविडने जैन यांना आपलं उत्तर कळवणं अपेक्षित आहे. असं न केल्यास राहुलला जैन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर रहावं लागू शकतं. मात्र बीसीसीआयच्या या नोटीशीवरुन भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली चांगलाच भडकला आहे, आता देवच भारतीय क्रिकेटचा वाचवू शकतो अशा आशयाचं ट्विट करत गांगुलीने आपला राग व्यक्त केला आहे.

यावर फिरकीपटू हरभजन सिंहनेही, द्रविड सारख्या सज्जन माणसाला नोटीस पाठवणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं आहे असं म्हणत गांगुलीच्या मताशी आपण सहमत असल्याचं म्हटलंय.

त्यामुळे राहुल द्रविड या नोटीशीला काय उत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 10:57 am

Web Title: rahul dravid gets conflict of interest notice from bcci ethics commission officer ganguly gets angry psd 91
Next Stories
1 अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान
2 ऋषभ पंत भारतीय संघाचं भविष्य, कर्णधार कोहलीकडून कौतुक
3 Ind vs WI : ऋषभ पंत फॉर्मात परतला, अखेरच्या सामन्यात विक्रमी खेळीची नोंद
Just Now!
X