News Flash

खेळाची विश्वासार्हता महत्त्वाची -द्रविड

आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरण खेदजनक असून, खेळाची विश्वासार्हता टिकवण्याला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

| August 6, 2013 04:58 am

आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरण खेदजनक असून, खेळाची विश्वासार्हता टिकवण्याला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘या गोष्टींनी खेळाचे नुकसान होते. चुकीच्या कारणांसाठी वृत्तपत्रांमध्ये शेवटच्या पानांऐवजी पहिल्या पानावर येणे योग्य नाही,’’ असेही द्रविडने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘असंख्य चाहत्यांना क्रिकेटबद्दल आत्मीयता आहे. आम्ही क्रिकेटपटू म्हणून जे काही आहोत ते चाहत्यांमुळेच. खेळाडू आणि चाहते असल्यामुळेच क्रिकेट प्रशासक काम करू शकतात. त्यामुळे खेळ असो, मंडळ किंवा सरकार असो, त्याच्या विश्वासार्हतेचे संवर्धन करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना कामकाजाइतकेच विश्वासार्हता कळीचा मुद्दा आहे,’’ याचा द्रविडने पुनरुच्चार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 4:58 am

Web Title: rahul dravid hits out at bcci says credibility of the game is important
Next Stories
1 ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस
2 आयपीएलच्या धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेची सलामी डी. वाय. पाटील स्टेडियमवर?
3 अर्जुनवीर सदा शेटय़े यांचा अमृतमहोत्सव सोहळा साजरा
Just Now!
X