05 July 2020

News Flash

राहुल द्रविडने उधळली विराटवर स्तुतीसुमनं, म्हणाला…

एका व्हिडीओ पॉडकास्टमध्ये व्यक्त केलं मत

जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. क्रीडा स्पर्धा कधी चालू होणार याची अद्याप कल्पना आलेली नाही. त्यातच सध्या मरणासन्न असलेल्या कसोटी क्रिकेटच्या पुनरूज्जीवनासाठी कितपत प्रयत्न होतील, याबाबतही साशंकता आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेटबद्दल कर्णधार विराट कोहलीचा दृष्टिकोन लक्षात घेत माजी फलंदाज राहुल द्रविड याने विराटचे कौतुक केले आहे.

“भारतीय क्रिकेटसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटचे मूल्य आणि महत्व माहिती आहे. विराट कायम कसोटी क्रिकेटबाबत बोलत असतो आणि आमची काही वेळा याबाबत चर्चाही झाल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया कशाप्रकारे प्रगती करू शकते याबाबत तो कायम विचार करत असतो. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या उज्ज्वल कामगिरीच्या बळावरच त्याला क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आदर आणि नावलौकिक मिळाला, असं बहुतेक त्याला वाटतं. आणि अशा परिस्थतीती त्याच्यासारखा आदर्श क्रिकेटपटू कोणी असूच शकत नाही”, अशा शब्दात द्रविडने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना विराटवर स्तुतीसुमने उधळली.

भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चपल यांनीही याच मुद्द्यावरून विराटची स्तुती केली होती. “भारत हाच कसोटी क्रिकेटचा तारणहार आहे. ज्यावेळी भारत आशा सोडून देईल, तेव्हा कसोटी क्रिकेट संपेल. केवळ भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीनच देश सध्या नव्याने क्रिकेटमध्ये येणाऱ्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. टी २० क्रिकेटला माझा विरोध अजिबातच नाही. झटपट निकाल लागणारे टी २० क्रिकेटचे सामने चाहत्यांना अधिक आकर्षित करतात. त्यामुळे त्याला प्रायोजक आणि इतर आर्थिक सहकार्य सहज मिळतं. कसोटी क्रिकेट मात्र काहीसं वेगळं आहे. कसोटी क्रिकेटसाठी कोणी पटकन प्रायोजकत्व देण्यास तयार होत नाही. चाहतेदेखील अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. भविष्यात ही समस्या वाढताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट’ असं म्हणतो म्हणूनच आता भारताकडून आशा आहेत”, असं ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 3:42 pm

Web Title: rahul dravid praises team india captain virat kohli for valuing test cricket in modern days vjb 91
Next Stories
1 सरदार पहली बार नमाज पढने आया है, अब अल्लाह उनकी पहली सुनेगा !
2 “…पर मारना तो पडेगा”; पियुष चावलाने सांगितला धोनीबद्दलचा भन्नाट किस्सा
3 Video : रोहित-धवन लाईव्ह चॅटमध्येच खो-खो हसत सुटले अन्…
Just Now!
X