05 April 2020

News Flash

अर्जून तेंडुलकरला मिळणार नाही राहुल द्रविडचं प्रशिक्षण

राहुल द्रविड अंडर-१९ संघासोबत श्रीलंकेला जाणार नसल्याने अर्जून तेंडुलकरने द्रविडकडून प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी गमावली आहे

भारताच्या अंडर-१९ आणि अ संघाचा प्रशिक्षक असलेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड अंडर-१९ संघासोबत श्रीलंकेला जाणार नसल्याने अर्जून तेंडुलकरने द्रविडकडून प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी गमावली आहे. राहुल द्रविड ‘भारत अ’ संघासोबत इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. १७ जूनपासून हा दौरा सुरु होत आहे. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत रमन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अर्जून तेंडुलकरची निवड झाली असल्या कारणाने अंडर-१९ संघाच्या श्रीलंका दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. सर्वांच्या नजरा अर्जून तेंडुलकरच्या कामगिरीवर असणार आहेत. त्यातच राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली संघ खेळणार असल्याने सर्वांचं विशेष लक्ष होतं. मात्र राहुल द्रविडने ‘भारत अ’ संघासंबंधी असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांमुळे इंग्लंड दौऱ्याला महत्व दिलं आहे.

गतवर्षीही द्रविड अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. त्याच्या अनुपस्थितीत रमन यांनीच प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. अंजर-१९ संघाने त्यावेळी इंग्लंडचा व्हाईटवॉश केला होता. सुरुवातीचे दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने पाचही एकदिवसीय सामने जिंकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 4:02 am

Web Title: rahul dravid will be not travelling with u 19 indian cricket team
Next Stories
1 थिम प्रथमच अंतिम फेरीत
2 फक्त एका हंगामानंतर समीर दिघेचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
3 अबब! न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या ५० षटकात ४९० धावा!
Just Now!
X