News Flash

‘रेड दी हिमालया’मध्ये ढगांची चादर…

‘रेड दी हिमालया’ या ऑफ रोड मोटार शर्यतीला शुक्रवारपासून सुरूवात झाली

कटिंडी डोंगरावरून हा मनमोहन दृष्याने छायाचित्रकारांचे लक्ष वेधले

‘रेड दी हिमालया’ शर्यतीच्या कटिंडी ते जतींग्री या २४.२९ किलोमीटरच्या अंतरात असलेल्या मुंडी गावावर ढगांनी अशी चादर चढवली होती.. शिमला ते मनाली या पहिल्या टप्प्यातील ३१० किलोमीटरच्या प्रवासात १२५.२६ किमीच्या शर्यतीत अरविंद के. पी. याने वर्चस्व गाजवले. मात्र, शर्यतीच्या दुसऱ्याच दिवशी हवामानाच्या लहिरीपणामुळे बग्गी ते प्रशार ( १७.९० किमी.) आणि प्रशार ते बग्गी २ ( १६.७७ किमी.) हे दोन टप्पे रद्द करण्यात आले. त्यामुळे शर्यत कटिंडी ते जतींग्री या टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कटिंडी डोंगरावरून हा मनमोहन दृष्याने छायाचित्रकारांचे लक्ष वेधले.
‘रेड दी हिमालया’ या ऑफ रोड मोटार शर्यतीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. समुद्रसपाटी पासून सर्वात उंच ठिकाणावर घेण्यात येणारी ही जगातिल एकमेव शर्यत आहे. सहा दिवसांच्या या शर्यतीत १५० शर्यतपटू जवळपास २००० किलोमीटरचे अंतर पार करून जेतेपद पटकाण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या शर्यतपटूंमध्ये १० महिला शर्यतपटूंचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:03 pm

Web Title: raid de himalaya contest update
Next Stories
1 … ही आहेत भारताच्या पराभवाची पाच कारणे
2 BLOG: रोहित शर्मा – चेंडूला पोचत करणारा कलाकार!
3 पराभवाचा उत्तम वस्तुपाठ