‘कॅचेस् व्हिन मॅचेस्’ असे म्हणतात परंतु, यावेळी वेगळेच घडले. एक झेल घेऊन सामन्याला उपस्थित असलेला प्रेक्षक १ लाख डॉलर बक्षिसाचा ‘व्हिनर’ ठरला. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात या प्रेक्षकाने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने लगावलेल्या षटकाराचा चेंडू एका हातात झेलून तब्बल एक लाख डॉलर जिंकले.
न्यूझीलंडमधील एका कंपनीने या सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांना नारंगी टी-शर्ट देण्यात आले होते. यामाध्यमातून ‘फॅन कॅच’ नावाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी कोणत्याही प्रेक्षकाने झेल टीपला असता त्याला बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते आणि अगदी झालेही तसेच.. मिशेल मॉर्टन या प्रेक्षकाने वेस्ट इंडिजचा फलंदाज किरॉन पॉवेलने मारलेला चेंडू एका हातात झेलला.
या बक्षिसाचा मानकरी ठरल्यानंतर मॉर्टन म्हणाला, त्याने चेंडू खरंच जोरदार टोलवला होता आणि येथील स्टेडियम आकाराने लहान असल्याने तो तितक्याच वेगाने येत होता. माझ्यापुढे माझे वडिल बसले होते. खरंतर त्यांच्या हातचा हा झेल होता. त्यांच्या हातातून झेल निसटला आणि मी तो झेल एका हातात झेलण्यास यशस्वी झालो. हे अगदी काही सेकंदात घडले. त्यामुळे यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. बक्षीस जिंकल्याचा मला आनंद आहे.
मिशेल मॉर्टनने झेल टिपल्याचा व्हिडिओ-