06 April 2020

News Flash

IPL 2020 : रॉब कॅसल राजस्थान रॉयल्सचे नवीन जलदगती गोलंदाजी प्रशिक्षक

ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेटमध्ये कॅसल यांची आश्वासक कामगिरी

राजस्थान रॉयल्स संघाच्या ताफ्यात आणखी एका प्रशिक्षकाची भर पडली आहे. गुरुवारी संघाच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील माजी खेळाडू रॉब कॅसल यांची जलदगती गोलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये आणि आयर्लंड संघाच्या अनेक जलदगती गोलंदाजांना कॅसल यांनी मार्गदर्शन केले आहे.

कॅसल यांचा अनुभव राजस्थानच्या गोलंदाजांसाठी महत्वाचा ठरु शकेल. सध्या राजस्थानच्या संघात अनेक महत्वाचे जलदगती गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून अधिक चांगली कामगिरी करुन घेण्याचं काम कॅसल यांच्या खांद्यावर असणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 12:51 pm

Web Title: rajasthan royals appoint rob cassell as new fast bowling coach psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 Ind vs NZ : परदेश दौऱ्याची विजयी सुरुवात, ६ गडी राखत भारताची बाजी
2 भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका : संघबांधणीचे प्रयोग सुरूच!
3 नौकानयनपटू दत्तू भोकनळला दिलासा
Just Now!
X