News Flash

शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा

चौकशीच्या सुरुवातीला कुंद्राने बुकीशी संपर्कात नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर आम्ही त्याला बुकीने दिलेला कबुलीजबाब सांगितला. शेवटी त्याने बुकीच्या संपर्कात असल्याचे मान्य केले.

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा हा बुकीच्या संपर्कात होता आणि त्याने बुकीकडून भेटवस्तूही स्वीकारली होती, असा खुलासा आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बी बी मिश्रा यांनी केला आहे. राज कुंद्राने सुरुवातीला बुकीच्या संपर्कात नाही, असे सांगितले. मात्र तपास अधिकाऱ्यांनी बुकींच्या फोन नंबरचा विषय काढताच राज कुंद्राने बुकींच्या संपर्कात असल्याचे कबुली दिली.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे बी बी मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज कुंद्रा आणि बुकींच्या संबंधांबाबत भाष्य केले. मिश्रा म्हणाले,चौकशीच्या सुरुवातीला कुंद्राने बुकीशी संपर्कात नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर आम्ही त्याला बुकीने दिलेला कबुलीजबाब सांगितला. शेवटी त्याने बुकीच्या संपर्कात असल्याचे सांगितले आणि बुकीकडून भेटवस्तू स्वीकारल्याचे मान्य केले.

‘कुंद्राने बुकीला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या मोबाईलमध्ये बुकीचा नंबर सेव्ह होता. यावर कुंद्राने मला बुकीकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता. म्हणून मी बुकीचा नंबर सेव्ह करुन ठेवला होता. जेणेकरुन त्याचे फोन आल्यावर मला तो बुकीचा फोन असल्याचे लक्षात यायचे आणि मी तो फोन उचलत नव्हतो. जर नंबर सेव्ह नसते केले तर अज्ञात नंबर समजून अनावधानाने मी फोन उचलला असता, असे स्पष्टीकरण त्याने दिले. मात्र, त्याचे हे म्हणणे ग्राह्य धरले तरी मग बुकीकडून भेटवस्तू का स्वीकारली? बुकीशी संपर्कात नाही सांगायचे आणि दुसरीकडे भेटवस्तू स्वीकारायच्या. हा विरोधाभास कसा, असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. शेवटी चौकशीत त्याने बुकींशी संपर्कात असल्याचे कबुली दिली.

कुंद्रा याने मिश्रा यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. कुंद्रा म्हणतो, तो बुकी असल्याचे मला माहित नव्हते. एका मित्राच्या पार्टीत माझी त्याच्याशी ओळख झालेली. यानंतर त्याने माझ्याशी संपर्कही वाढवला होता. माझ्या मुलाचा नुकताच जन्म झाला होता आणि त्याच्यासाठी त्या व्यक्तीने मला सोन्याची चेन भेट म्हणून दिली. मी ती स्वीकारली नाही. यानंतर त्याने ती चेन आमच्या सुरक्षारक्षकाकडे दिली आणि तिथून निघून गेला, असे कुंद्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 8:46 am

Web Title: rajasthan royals co owner raj kundra contact with bookie says ipl investigator b b misra
Next Stories
1 Asian Games 2018 : गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंगने पटकावले सुवर्णपदक; केला २०.७५ मीटरचा विक्रम
2 Asian Games 2018 : धक्क्यातून धडा घ्यावा!
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रशिक्षकपदावरुन डॅनिअल व्हिटोरीची गच्छंती?
Just Now!
X