News Flash

राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का; चौथ्या परदेशी खेळाडूनं सोडली साथ

राजस्थान रॉयल्सची ट्वीट करून माहिती

सौजन्य- iplt20.com

राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. आता अँड्र्यु टाय मायदेशी परतला आहे. अँड्र्र्यु टाय राजस्थान रॉयल्स संघ सोडणारा तिसरा परदेशी खेळाडू आहे. यापू्र्वी बेन स्टोक्स दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्यानंतर लियाम लिविंगस्टोननं बायो बबलमध्ये येण्याऱ्या थकव्यामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. आता अँड्र्यु टायचा या यादीत समावेश झाला आहे. जोफ्रा आर्चरही शस्त्रक्रियेनंतर इंग्लंडमध्येच आहे आणि आयपीएल खेळत नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या जाण्यानं राजस्थान संघात आता चार परदेशी खेळाडू उरले आहेत. त्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेविड मिलर आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्सनं याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. ‘व्यक्तिगत कारणांमुळे अँड्र्यु टाय ऑस्ट्रेलियात गेला आहे. त्याला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल, तर आम्ही त्याला करू’, असं ट्वीट राजस्थान रॉयल्सनं केलं आहे.

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत ५ सामने खेळले आहेत. एकाही सामन्यात अँड्र्यु टायला संधी मिळाली नाही. मागच्या पर्वातही त्याला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या.

IPL 2020: जडेजाच्या वादळापुढे बंगळुरु बेचिराख; चेन्नई गुणतालिकेत अव्वल

राजस्थान आतापर्यंत पाच सामने खेळले आहे. त्यात तीन सामन्यात पराभव तर दोन सामन्यात विजय मिळाला आहे. आयपीएल गुणतालिकेत राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्स या परत गेलेल्या चार खेळाडूंची जागा कशी भरते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 10:24 pm

Web Title: rajasthan royals fourth foreign player left the team and gone home rmt 84
Next Stories
1 “देवाला कळलं, की रजनीकांत म्हातारा झालाय म्हणून त्यानं…”, धोनीचं जुनं ट्विट चर्चेत
2 IPL 2020: जडेजाच्या वादळापुढे बंगळुरु बेचिराख; चेन्नई गुणतालिकेत अव्वल
3 SRH vs DC : रंगतदार सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची हैदराबादवर मात
Just Now!
X