News Flash

मुंबईच्या प्रगतीसाठी माजी खेळाडूंच्या अनुभवाचा उपयोग करू!

माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी यांचे मत

माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर आधारित ‘हा चेंडू दैवगतीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले.

माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी यांचे मत

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबई संघाची कामगिरी गेल्या काही वर्षांत ढासळली असली तरी येत्या काळात मुंबईला लाभलेल्या मातब्बर क्रिकेटपटूंच्या अनुभवाचा उपयोग करून पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटला झळाळी देण्याचा प्रयत्न करू, असे मत मुंबई क्रिकेट सुधारणा समितीचे सदस्य व माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर आधारित ‘हा चेंडू दैवगतीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. या वेळी शिवलकर यांच्यासह विलास गोडबोले, सुधीर नाईक, दीपक करंजीकर, प्रदीप वेलणकर या हजेरी लावली होती.

‘‘मुंबईतील स्थानिक क्रिकेटच्या अवस्थेत नक्कीच सुधारणेला वाव आहे. आमची समिती ऑगस्ट महिन्यातच रुजू झाल्याने हा हंगाम संपताच आम्ही स्थानिक क्रिकेटसाठी काही ठोस पावले उचलणार आहोत.  आम्ही दर आठवडय़ाला किंवा महिन्याला किमान एका माजी खेळाडूला तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आवाहन करू. यामध्ये सलामीच्या फलंदाजापासून ते फिरकी गोलंदाज अशा प्रकारच्या सर्व माजी खेळाडूंचा समावेश असेल,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 2:39 am

Web Title: raju kulkarni release book based on padmakar shivalkar cricket career
Next Stories
1 राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा : रा. फ. नाईक विद्यालयाला जेतेपद
2 इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच इंदिरा गांधी स्टेडियमवर
3 मायदेशी परतलेल्या अभिनंदन यांचा BCCI कडून सन्मान
Just Now!
X