ओमफिले रमेलाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका अ संघाने भारत अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा  निर्णय घेतला. रीझा हेन्ड्रिक्स आणि स्टॅनिऑन व्हॅन झील यांनी ६० धावांची सलामी दिली. इश्वर पांडेने ही जोडी फोडली. व्हॅन झिलने २८ धावा केल्या. हेन्ड्रिक्स ५० धावांवर बाद झाला. थेयुनिस डि ब्रुयानने ३८ धावा केल्या. रमेला आणि तेंबा बावूमा यांनी चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत रमेलाने शतक पूर्ण केले. अक्षर पटेलने त्याला बाद केले. रमेलाने १२ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २९३ धावा झाल्या आहेत. बावूमा ५५ धावांवर खेळत आहे.