भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते.

 

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
Satyam Surana
पंतप्रधान मोदींचे समर्थन केल्यामुळं युकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची हेटाळणी
victory of the United Alliance of Leftist Student Unions in the JNU Student Union Elections
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष

सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने अर्जदारांची मुलाखत घेतली आणि पोवारच्या नावावर एकमताने सहमती दर्शविली.

रमेश पोवारने भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पोवारने प्रशिक्षणाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यंदाची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा जिंकणार्‍या मुंबई संघाचा पोवार प्रशिक्षक होता. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

मिताली राजशी झाला होता वाद

२०१८मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप दरम्यान रमेश पोवार भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी मिताली राजशी झालेला वाद चर्चेत आला होता. वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात मितालीला खेळू न दिल्यामुळे हा वाद सुरू झाला. नंतर पोवारला या पदावरून हटविण्यात आले. मिताली राज सध्या भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार आहे.