25 October 2020

News Flash

रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. जोपर्यंत तुषार अरोठेंच्या जागी योग्य व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत रमेश पोवारकडे जबाबदारी असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं. तुषार अरोठे यांच्या कोचिंग पद्धतीवर खेळाडू नाराज होते. भारतीय महिला संघाच्या टीम कॅम्पला २५ जुलैपासून बंगळुरुत सुरुवात होत आहे. रमेश पोवार या कॅम्पमध्ये सहभागी होईल. दरम्यान बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून अर्ज करण्यासाठी २० जुलै अंतिम तारीख आहे.

जबाबदारी मिळाल्याचा मला आनंद असून, माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन असं रमेश पोवारने म्हटलं आहे. ४० वर्षीय रमेश पोवार भारतासाठी दोनच कसोटी सामने खेळला आहे. दोन सामन्यात त्याने सहा विकेट्स घेतले होते. याशिवाय त्याने ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रमेश पोवारची कामगिरी उत्तम होती. त्याने १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 12:53 pm

Web Title: ramesh powar appointed interim coach of indian woman cricket team
Next Stories
1 ‘५० लाख लोकसंख्येचा देश फुटबॉल खेळतोय आणि आम्ही हिंदू मुस्लिम खेळतोय’
2 Wimbeldon 2018 Women’s Final : बाबरेरा, कॅटरिना जोडीचे सलग दुसरे विजेतेपद
3 Wimbeldon 2018 Men’s Double Final : भावाविना खेळणाऱ्या माइक ब्रायनची विजेतेपदाला गवसणी
Just Now!
X