इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथ आपली शेवटची कसोटी खेळत आहे. या सामन्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. पण जाता जाता त्याने आपले नाव इतिहासात नोंदवले असून एक इतिहास रचला आहे.

श्रीलंकेच्या रंगना हेराथने गॉलच्या मैदानावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला बाद केले आणि एक इतिहास रचला. जो रूट हा हेराथचा गॉलच्या मैदानावरील १००वा बळी ठरला. हा हेराथचा अंतिम कसोटी सामना आहे. त्यामुळे त्याचा हा पराक्रम विशेष मानला जात आहे. या मैदानावर असा पराक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. या आधी श्रीलंकेचा महान माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन या दोघांनी या मैदानावर १०० बळींचा टप्पा गाठला आहे.

महत्वाची बाब म्हणजे हेराथने आपला पदार्पणाचा कसोटी सामना याच मैदानावर खेळला होता. आता अंतिम सामनादेखील याच मैदानावर खेळत आहे. दरम्यान, जो रूट हा हेराथचा कसोटी कारकिर्दीतील ४३१ वा बळी होता.